ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक विभागाच्या (राष्ट्रीय मानक संस्था) मुंबई शाखा कार्यालय -II ने घरगुती तसेच तत्सम उद्देशासाठी प्लग आणि सॉकेट-आउटलेट्सविषयीच्या नव्याने जारी मानकांवर चर्चेसाठी केले मानक मंथनचे आयोजन
मानक सुधारणेसाठी भागधारकांकडून मिळाले उपयुक्त अभिप्राय
Posted On:
26 JUL 2024 3:45PM by PIB Mumbai
मुंबई, 26 जुलै 2024
बिस अर्थात भारतीय मानक विभागाच्या (राष्ट्रीय मानक संस्था) मुंबई शाखेच्या कार्यालय -II च्या वतीने नव्याने जारी झालेल्या मानक IS 1293 : 2019 वर चर्चा करण्यासाठी मानक मंथन आयोजित केले होते. हायब्रीड मोडमध्ये घरगुती तसेच तत्सम उद्देशासाठी प्लग आणि सॉकेट-आउटलेट्सविषयी ही मानके असून त्यावर ही चर्चा झाली. या उपक्रमात 35 उत्पादक, चाचणी प्रयोगशाळांचे प्रतिनिधी आणि वापरकर्ते सहभागी झाले.
बिसच्या मुंबई शाखा कार्यालय-II चे वरिष्ठ संचालक संजय विज यांच्या हस्ते मानक मंथनचे उद्घाटन झाले. मानक मंथन आयोजित करण्यामागची गरज काय याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन केले. भारतीय मानकांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी काय करता येईल हे सर्व सहभागींनी सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी उपसंचालक टी. अर्जुन यांनी विविध संस्थेच्या उपक्रमांविषयी तसेच नवीन प्रकाशित मानक IS 1293 : 2019 - घरगुती आणि तत्सम उद्देशांसाठी प्लग आणि सॉकेट-आउटलेट्स बद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यांनी मानकांबद्दल त्यांची मते तपशीलाने सांगितली. त्यानंतर त्यांनी सहभागींना प्रत्येक तरतुदीप्रमाणे त्यांचे अभिप्राय देण्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी मानकांची तांत्रिक वैशिष्ट्ये सविस्तरपणे सांगितली.
मानक मंथनला उत्तम आणि सक्रिय प्रतिसाद मिळाला. चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्यांचे अभिप्राय तांत्रिक विभागापर्यंत पोहोचवण्यात येतील. कार्यक्रमाची काही छायाचित्रे सोबत जोडली आहेत.
* * *
PIB Mumbai | S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2037499)
Visitor Counter : 38