माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कारगिल विजय दिवसाचा रौप्य महोत्सव : सीबीसी गोवा कडून कारगिल युद्धावर दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 25 JUL 2024 7:06PM by PIB Mumbai

पणजी, 25 जुलै 2024
 

माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो (सीबीसी )-गोवा ने पणजी मधील आझाद मैदान येथे 26 आणि 27 जुलै 2024 रोजी  कारगिल विजय दिवसाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग, एव्हीएसएम, व्हीएसएम, यांच्या हस्ते 26 जुलै 2024 रोजी सकाळी 10:45 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.या छायाचित्र प्रदर्शनात कारगिल युद्धाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांचा विशेष संग्रह असणार आहे. ज्यात आपल्या सैनिकांचे शौर्य,सौहार्दाचे मार्मिक क्षण आणि युद्धभूमीतील दृश्ये यांचा समावेश असेल. ही छायाचित्रे आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या शूर वीरांप्रति केवळ आदरांजली नसेल तर आपल्या इतिहासातील या महत्त्वपूर्ण अध्यायाबद्दल अभ्यागतांना शिक्षित आणि प्रेरित करण्याचे साधन देखील असेल.

स्मृतींव्यतिरिक्त,हे प्रदर्शन अभ्यागतांना कारगिल युद्धादरम्यान समोर आलेली आव्हाने आणि मिळालेल्या विजयाबाबत अधिक तपशीलवार जाणून घेण्याची  संधी देईल. युवा पिढीमध्ये आपल्या सैनिकांच्या बलिदानाबाबत राष्ट्रीय अभिमान आणि कौतुकाची भावना वृद्धिंगत करणे  हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे.

या  प्रदर्शनासाठी सर्व अभ्यागतांसाठी प्रवेश विनामूल्य असून ते सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुले राहील.

कर्नल जीसस फर्ताडो,कमांडिंग ऑफिसर, 1 गोवा बटालियन एनसीसी पणजी; पत्रसूचना कार्यालय, पणजीचे संचालक नाना मेश्राम;कारगिल युद्धातील माजी अधिकारी लेफ्टनंट कर्नल ऑस्टिन कोलाको (निवृत्त)आणि कॅप्टन उत्पल दत्ता (निवृत्त)हे देखील उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनाच्या दिवशी पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात  सकाळी 11.00 वाजता एक कार्यक्रम होईल ज्यामध्ये कारगिल युद्धातील ज्येष्ठ अधिकारी लेफ्टनंट कर्नल ऑस्टिन कोलाको यांचे अतिथी व्याख्यान, एनसीसी कॅडेट्स आणि सांस्कृतिक पथकाद्वारे युद्धातील आपल्या शूर वीरांचे बलिदान दर्शवणारा कलाविष्कार सादर केला जाईल.


S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

Follow us on Social Media:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

 


(Release ID: 2037125) Visitor Counter : 67


Read this release in: English