संरक्षण मंत्रालय
नौदलाच्या ब्रह्मपुत्रा जहाजावरील घटनेविषयी ताजी माहिती
Posted On:
25 JUL 2024 2:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2024
मुंबईतील नौदलाच्या गोदीत आयएनएस ब्रह्मपुत्राच्या दुर्दैवी घटनेनंतर, नौदलप्रमुख दिनेश के त्रिपाठी यांनी 23 जुलै 24 रोजी मुंबईला भेट दिली. त्यांनी अपघाताचा घटनाक्रम आणि बेपत्ता खलाशाचा शोध घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.
जहाज पुन्हा कार्यक्षम बनवण्यासाठी नुकसान आटोक्यात ठेवून जहाज पुन्हा पूर्वस्थितीत आणण्याची योजना आणि दुरुस्ती बाबत नौदल प्रमुखांना माहिती देण्यात आली. आयएनएस ब्रह्मपुत्राला समुद्रसफरीसाठी आणि युद्धासाठी सज्ज करण्याकरिता सर्व कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देश नौदल प्रमुखांनी कमांड आणि नौदल मुख्यालयाला दिले.
ब्रह्मपुत्रा जहाजावरील चालक दलाशी संवाद साधताना नौदल प्रमुखांनी त्यांना भारतीय नौदलाच्या प्रामाणिक भावनेला अनुरूप जहाज लवकर कार्यान्वित करण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले.
समुद्रातील शोधमोहिमेनंतर काल प्रमुख खलाशी सीतेंद्र सिंह यांचा मृतदेह सापडला.
नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि भारतीय नौदलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रमुख खलाशी सितेंद्र सिंह यांच्या कुटुंबीयांप्रति शोकभावना व्यक्त केल्या. या दु:खद प्रसंगी भारतीय नौदल शोकाकुल परिवारासोबत खंबीरपणे उभे आहे.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2036835)
अभ्यागत कक्ष : 73