माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केन्द्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर विद्यार्थ्यांना आणि जनसामान्यांना कारगिल विजय गाथा पोहोचवणार


26 आणि 27 जुलै रोजी वी.एम.वीमहाविद्यालयात दोन दिवसीय मल्टिमीडिया फोटो प्रदर्शनाचे आयोजन

दोन दिवसीय कार्यक्रमात निवृत्त एअर व्हाईस मार्शल सुर्यकांत चाफेकर आणि निवृत्त मेजर जनरल एपी बामअसतीलप्रमुख अतिथी

Posted On: 25 JUL 2024 2:09PM by PIB Mumbai

नागपूर, 25 जुलै 2024

26 जुलै 2024 रोजी कारगिल विजयाला 25 वर्षे पूर्ण होतील. या युद्धात आपल्या शौर्य आणि पराक्रमाने भारताला विजय मिळवून देणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ, भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केन्द्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि वर्धमान नगर येथील व्हीएमव्ही वाणिज्य, जे.एम.टी. कला आणि जे.जे.पी. विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 26 आणि 27 जुलै 2024 रोजी महाविद्यालय प्रांगणात 'कारगिल विजय दिवस - रौप्य जयंती' या विषयावर दोन दिवसीय मल्टिमीडिया फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, 26 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या उद्घाटन समारंभात निवृत्त एअर व्हाईस मार्शल सुर्यकांत चाफेकर (अति विशिष्ट सेवामेडल,शौर्यचक्र) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचीअध्यक्षता श्री योगेशभाई पटेल,अध्यक्ष, नागपूर गुजराती मंडळकरतील, तसेचश्रीसौरभ खेकडे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी, केन्द्रीयसंचार ब्युरो,क्षेत्रीय कार्यालय, नागपूर;डॉ. अभय मुद्गल, कार्यकारी प्राचार्य व्हीएमव्ही महाविद्यालय, आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी प्रामुख्यानेउपस्थित राहतील. उद्घाटन समारंभानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


मेजर जनरल एपी बाम करतील प्रेरित

या आयोजनाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवार, 27 जुलै रोजी समारोप सत्रात निवृत्त मेजर जनरल एपी बाम, (सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल)कार्यक्रमाची शोभा वाढवतील. ते आपल्या ओजस्वी विचारांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करतील. या वेळी नागपूर गुजराती मंडळाचे महासचिव अधिवक्ता श्री संजयभाई ठाकर या सत्राची अध्यक्षता करतील. अतिथींच्या हस्ते चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील.


युद्धाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

या छायााचित्र प्रदर्शनात कारगिल युद्धाशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे पाहायला मिळतील, तसेच युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासह इतर सैनिकांबद्दल आणि युद्धात वापरलेल्या शस्त्रास्त्र व उपकरणांबद्दल प्रेरणादायी माहितीही दर्शकांना मिळेल.हे प्रदर्शन सर्व विद्यार्थी आणि नागरिकांसाठी नि:शुल्क उपलब्ध असेल. श्री सौरभ खेकडे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी, केन्द्रीयसंचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर; डॉ. अभय मुद्गल, महाविद्यालयाचे प्राचार्यआणि डॉ.सीमा पांडे, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या समन्वयकयांनी सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


S.Khekde/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2036757) Visitor Counter : 118


Read this release in: English