संरक्षण मंत्रालय
नौदलाच्या जहाजावर आग
Posted On:
22 JUL 2024 10:19AM by PIB Mumbai
Mumbai : 22 July 2024
नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे दुरुस्ती आणि देखभाल सुरु असलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजावर 21 जुलै 2024 रोजी संध्याकाळी आग लागली.
जहाजावर नियमित देखभालीचे काम करत असताना जहाजावरील कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे लक्षात आले. जहाजाच्या अग्निशमन दलाने तात्काळ आग विझवण्यास सुरुवात केली. नौदल डॉकयार्ड, मुंबई आणि आसपासच्या इतर युनिट्सच्या अग्निशमन दलाने आग शमवण्यात मदत केली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नौदल अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
***
JPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2034872)
अभ्यागत कक्ष : 83