दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये राखी लिफाफे उपलब्ध

प्रविष्टि तिथि: 19 JUL 2024 6:46PM by PIB Mumbai

पणजी, 19 जुलै 2024


या वर्षी 19 ऑगस्ट 2024 रोजी "रक्षाबंधन" हा सण साजरा केला जाणार आहे. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा मंगल सण लोक संपूर्ण देशात साजरा करतात. या निमित्ताने जनतेच्या सोयीसाठी गोव्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये आकर्षक रंगांचे राखी लिफाफे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक राखी लिफाफ्याची विक्री किंमत 12 रुपये आहे.राखी लिफाफा जलद पाठवण्यासाठी स्पीड पोस्टच्या बुकिंगच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि जवळच्या टपाल कार्यालयांमध्ये मधून राखी लिफाफे खरेदी करावेत.राखीच्या या छोट्या धाग्याने "प्रेम आणि आपुलकी" चे बंध घट्ट होऊ देत.

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 2034452) आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English