अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई सीमाशुल्क विभागाने 24 प्रकरणांमध्ये राबवलेल्या मोहिमांमध्ये जप्त केले 10.33 कोटी रुपये मूल्याचे 13.24 किलोहून अधिक सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि 0.45 कोटी रुपये किमतीचे परकीय चलन

Posted On: 17 JUL 2024 7:23PM by PIB Mumbai

मुंबई, 17 जुलै 2024

विमानतळ आयुक्तालय, मुंबई सीमाशुल्क विभाग-III ने 10-14 जुलै 2024 दरम्यान एकूण 24 प्रकरणांमध्ये 10.33 कोटी रुपये मूल्याचे  13.24 किलोहून अधिक सोने आणि  इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि 0.45 कोटी रुपये किमतीचे परकीय चलन जप्त केले. मेणामध्ये मिसळलेली सोन्याची भुकटी, घडवण्यासाठी आणलेले दागिने, सामानात लपवून, कपड्यांमध्ये, कागदाच्या थरांमध्ये, शरीरात आणि तस्करांच्या शरीरावर लपवलेल्या सोन्याच्या पट्ट्या अशा विविध कल्पक स्वरुपात होत असलेली सोन्याची तस्करी या कारवायांमध्ये उघडकीला आली. यावेळी सात सुवर्ण तस्करांना अटक करण्यात आली.

   

दुबई (02), अबू धाबी (02) आणि जेद्दाह (01) येथून आलेल्या  पाच भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 24 कॅरेट  सोन्याची भुकटी, 24 कॅरेट कच्च्या सोन्याच्या साखळ्या, आणि बांगड्या अश्या स्वरूपातील एकूण 4850 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. हे सोने शरीरामध्ये, कपड्यांच्या थरांमध्ये, शरीरावर, आणि सामानात दडवण्यात आले होते. या प्रकरणी पाच सुवर्ण तस्करांना अटक करण्यात आली.

उत्तरप्रदेश मध्ये मुझफ्फरनगर आणि उत्तराखंड मध्ये हरिद्वार येथील रहिवासी असलेल्या दोन भारतीय नागरिकांना सीआयएसएफने अटक केली आणि एआययूच्या ताब्यात दिले. त्यांच्या हातातील पिशवीत एकूण 1950 ग्रॅम वजनाची मेणात मिसळलेली 24 कॅरेट  सोन्याची भुकटी होती. यावेळी दोन सुवर्ण तस्करांना अटक करण्यात आली.

   

एका विमानाच्या तपासणी दरम्यान एकूण 3199  ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोने मिश्रित मेण जप्त करण्यात आले. त्यामधील सोने 3010  ग्रॅम वजनाचे होते. त्याची अंदाजे किंमत 1,89,79,976/- रुपये इतकी होती. हे सोने विमानाच्या प्रसाधन गृहातील नळा खालच्या जागेत दडवले होते.  

बँकॉकला जाणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 7,300 युरो, 2,500 अमेरिकन डॉलर्स, 29,000 पाउंड स्टर्लिंग आणि 12,000 न्यूझीलंड डॉलर्स, असे 44,76,380/- रुपये मूल्याचे परदेशी चलन जप्त करण्यात आले. हे चलन लॅपटॉप बॅगमध्ये शिवलेल्या चोर कप्प्यात दडवण्यात आले होते.

   

अबुधाबी (12), दुबई (02), बहरीन (01), शारजाह (01) येथून आलेल्या सोळा भारतीय नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 3431.00 ग्रॅम सोने आणि 2,16,34,655/- रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या. हा तस्करीचा माल बॅगा, कागदाचे थर, इजारीचे खिसे, शरीरावर आणि तस्करांच्या शरीरावर लपवण्यात आले होते.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2033889) Visitor Counter : 62


Read this release in: English