शिक्षण मंत्रालय
एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 परीक्षा : प्राचार्य आणि संस्थाप्रमुखांनी परीक्षा केंद्रांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
ऑनलाईन पोर्टल 11 ते 31 जुलै 2024 पर्यंत खुले राहील
Posted On:
15 JUL 2024 8:45PM by PIB Mumbai
मुंबई, 15 जुलै 2024
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, एनआयओएसने ऑक्टोबर- नोव्हेंबर 2024 साठी सार्वजनिक परीक्षा ऑक्टोबर 2024 च्या पहिल्या आठवड्यात नियोजित केली आहे. सीबीएसई/आयसीएसई/ राज्य मंडळ/ विद्यालये यांच्याशी संलग्न असलेली केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये, सरकारी/सरकार अनुदानित खाजगी शाळा/महाविद्यालये/ संस्था या ठिकाणी परीक्षा केंद्रे असतील.
या परीक्षांच्या आयोजनाच्या तयारीसाठी शाळा/महाविद्यालयांचे प्राचार्य/प्रमुख यांना अशी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी एनआयओएसच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. https://exams.nios.ac.in. हे परीक्षा केंद्र नोंदणीचे यूआरएल आहे. परीक्षा केंद्रांसाठीचे सविस्तर निकष संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्राचार्य/संस्थाप्रमुख यांनी उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरील बँक स्वीकृती प्रपत्र(प्रोफॉर्मा) भरून पूर्ण करावे आणि अपलोड करावे. यासोबत मूळ केंद्र स्वीकृती अर्ज पूर्णपणे भरून तातडीने संबंधित एनआयओएस प्रादेशिक केंद्रावर सादर करणे गरजेचे आहे.
हे अर्ज जमा करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल 11 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 पर्यंत खुले असेल. यापूर्वी नोंदणी केलेली शाळा/ महाविद्यालये यांनी या परीक्षा सत्रासाठी त्यांच्या सहभागाची पुष्टी करणे आणि आवश्यक तपशील अद्ययावत करणे गरजेचे आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग(एनआयओएस) माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा एप्रिल- मे आणि ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये, एनआयओएसच्या मुख्यालयाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार घेत असते.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2033502)
Visitor Counter : 61