दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोव्यातील पणजी येथील पोस्टमास्टर जनरल कार्यालयात, टपाल विभाग कर्मचारी निवृत्तीवेतन अदालतीचे केले जाणार आयोजन
Posted On:
10 JUL 2024 8:38PM by PIB Mumbai
पणजी, 10 जुलै 2024
टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी, दिनांक 7/08/2024 रोजी दुपारी 3.00 वाजता गोव्यातील पणजी येथील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात, गोवा टपाल विभागाची (ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा देखील समावेश आहे) टपाल विभाग निवृत्ती वेतन अदालत आयोजित केली जाणार आहे.
टपाल विभागातून (टपाल विभागाचे निवृत्तीवेतनधारक) सेवानिवृत्त किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्यांच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन लाभासंबंधीच्या तक्रारी तसेच ज्यांच्या निवृत्तीवेतनाच्या तक्रारी 3 महिन्यांच्या आत निकाली काढल्या गेल्या नाहीत अशा तक्रारी या निवृत्तीवेतन अदालतीमध्ये निवारणासाठी विचारात घेतल्या जातील. या टपाल निवृत्तीवेतन अदालतीमध्ये CAT किंवा न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे, वारसाहक्क विवाद आणि धोरणासंबंधीच्या तक्रारी आणि इत्यादी, यांसारख्या पूर्णपणे कायदेविषयक समस्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.
महेश एन.लेखाधिकारी आणि सचिव, पेन्शन अदालत O/o पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी-403001 या पत्त्यावर किंवा accts.goa@indiapost.gov.in या ई-मेल पत्त्यावर निवृत्तीवेतनधारक आपल्या तक्रारींचे अर्ज खाली दिलेल्या विहित रूपात 26/07/2024 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करू शकतात. दिनांक 26/07/2024 नंतर प्राप्त झालेल्या अर्जांवर निवृत्तीवेतन अदालतीत विचार केला जाणार नाही.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2032236)
Visitor Counter : 51