सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
नागपूरच्या राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय- एनएसएसओच्या वतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा
'डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग' हे कुठल्याही व्यवसायाच्या यशस्वी संचालनाकरिता महत्त्वपूर्ण- डॉ. हरिओम पुनयानी
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2024 7:24PM by PIB Mumbai
नागपूर 29 जून 2024
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या सेमिनरी हिल्स स्थित राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय- एनएसएसओच्या वतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून हिस्लॉप महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. हरिओम पुनयानी यांनी सांगितले की कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी माहितीचे संकलन करणे आवश्यक असते . 'डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग' हे कुठल्याही व्यवसायाच्या यशस्वी संचालनाकरिता महत्त्वपूर्ण आहे, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
याप्रसंगी एनएसएसओ नागपूर कार्यालयाचे संचालक एल. एम. जडेजा यांनी तरुण पिढीने सांख्यिकी क्षेत्रात करिअर करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून नरेगा, पेंशन शिष्यवृत्ती यासाठी माहिती विश्लेषण महत्वाचे असून ही माहिती धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी वापरली जाते असे नमुद केले.

सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा.प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन '२९ जून' दरवर्षी 'राष्ट्रीय सांख्यिकी दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या सांख्यिकी दिवसाची संकल्पना " "निर्णय क्षमतेमध्ये माहितीचा वापर वापर"" अशी आहे.


या प्रसंगी प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि क्रॉसवर्ड पझल स्पर्धा देखील आयोजित आली. या कार्यक्रमाला सांख्यिकी विभागातील अधिकारी कर्मचारी. सांख्यिकीशास्त्राचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
***
SR/DW/PK/DD
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2029555)
आगंतुक पटल : 116
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English