सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय नागपुरव्दारे उदया सांख्यिकी दिवसाचे आयोजन
Posted On:
28 JUN 2024 6:11PM by PIB Mumbai
नागपूर 28 जून 2024
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय - एनएसएसओ (क्षेत्र संकाय विभाग) नागपुर व्दारे 29 जून शनिवार रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण कक्ष, भारतीय खान ब्यूरो, इंदिरा भवन तीसरा माळा, सिविल लाइन्स, येथे सांख्यिकी दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रोफेसर (स्वर्गीय) प्रशांत चन्द्र महालनोबिस यांच्या देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकी विकासात योगदानाचे स्मरण करण्याच्या हेतूने त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केंद्र सरकार द्वारे करण्यात आली आहे .
यावर्षीच्या सांख्यिकी दिवसाची संकल्पना " "निर्णय क्षमतेमध्ये माहितीचा वापर वापर"" अशी आहे.
एल.एम.जाडेजा, संचालक, एन एस एस ओ, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली, श्री पी.के.संतोष, उप संचालक , श्री सुजीत बी.पुजारी, उप संचालक, श्री निर्णय प्रताप सिंह, उपसंचालक, आणि श्री संतोष नायक बोडा, सहायक संचालक यांच्या उपस्थितीत 18 वा सांख्यिकी दिन साजरा केला जाईल. या प्रसंगी प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि क्रॉसवर्ड पझल स्पर्धा देखील आयोजित करण्यातआल्याची माहिती एनएसएसओ नागपूर कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
***
SR/DW/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2029364)
Visitor Counter : 68