अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयकर विभाग नागपूरतर्फे धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत विषयक तरतुदी आणि नोंदणी संदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे 26 जून रोजी आयोजन

Posted On: 24 JUN 2024 9:11PM by PIB Mumbai

नागपूर, 24 जून 2024 

 

पुण्याचे कर-सवलत विभागाचे आयकर आयुक्त अभिनय कुंभार आणि  नागपूरचे आयकर सहआयुक्त डॉ. भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्झ्म्पशन रेंज, प्राप्तिकर विभागा तर्फे धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत विषयक तरतुदी आणि नोंदणी संदर्भात एक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या 26 जून बुधवार रोजी दुपारी 4 ते 5.30 पर्यंत चाणक्य सभागृह, आयकर भवन सिव्हिल लाईन्स, सेमिनरी हिल्स, नागपूर  येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत विषयक तरतुदी आणि नोंदणीसाठी मूलभूत आवश्यकता तसंच धर्मादाय संस्थांच्या नोंदणी प्रक्रियेतील अलीकडील बदल हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे.

सनदी लेखापाल प्रणव अष्टेकर या  कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते असतील. सर्व विश्वस्त,कर्मचारी, प्राप्तिकर अभ्यासक आणि चार्टर्ड अकाउंटंट यांनी मोठ्या संख्येनं  उपस्थित राहावं  असं आवाहन आयकर विभागा व्दारे करण्यात आले आहे.

 

* * *

(Source: IT Department) | PIB Nagpur | S.Rai/D.Wankhede/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2028392) Visitor Counter : 62


Read this release in: English