वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय निर्यात संघटनांच्या महासंघाकडून (FIEO) कडून (पश्चिम क्षेत्र) दिले जाणारे निर्यात उत्कृष्टता पुरस्कार आज मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2024 9:16PM by PIB Mumbai

फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन अर्थात भारतीय निर्यात संघटना महासंघा (पश्चिम क्षेत्र) तर्फे आज मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत 8व्या आणि 9व्या एक्सपोर्ट एक्सलन्स पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

"महाराष्ट्र राज्य हे भारताच्या निर्यातीत सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्यांपैकी एक राज्य असून निर्यात प्रोत्साहन आणि व्यापार सुलभीकरण उपक्रमांद्वारे जागतिक व्यापारात आपला वाटा सातत्याने वाढवत आहे, असे राज्यपाल रमेश बैस यावेळी म्हणाले.

"एफआयईओ ने या आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने केली आहे, व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत एप्रिलमध्ये 3% आणि मे महिन्यात 9% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर दोन्ही महिन्यांत सेवा निर्यात 12% च्या जवळपास वाढली आहे, अशी माहिती एफआयईओ चे अध्यक्ष अश्वनी कुमार यांनी दिली.


"युक्रेन आणि रशिया युद्ध, हमास-इस्रायल संघर्ष, लाल समुद्रातील संकट आणि संबंधित लॉजिस्टिक आव्हाने आणि उच्च हितसंबंध यातून निर्माण होणाऱ्या जागतिक स्तरावरील विरोधी प्रवाहांचा विचार करता ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे." असेही अश्वनी कुमार यांनी सांगितले. एफआयईओ अध्यक्षांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि एकूणच एक्झिम परिवाराच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले आणि प्रशंसा केली."
सर्वाधिक परकीय चलन कमावणारे, महिला उद्योजक, उदयोन्मुख निर्यातदार, बँका आणि वित्तीय संस्था तसेच सेवा प्रदाते अशा विविध श्रेणींमध्ये एक्सपोर्ट एक्सलन्स पुरस्कारांच्या या 8व्या आणि 9व्या आवृत्तीत 56 उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांचा सत्कार करण्यात आला.

***
S.Tupe/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2028032)
आगंतुक पटल : 78
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English