वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीजीएफटीद्वारे मुंबईत ई-कॉमर्स निर्यात शिखर परिषदेचे आयोजन

Posted On: 14 JUN 2024 8:50PM by PIB Mumbai

मुंबई, 14 जून 2024

सीमा शुल्क , इंडिया पोस्ट, आयसीएआय ,अमेझॉन आणि ई-कॉमर्स व्यवस्थेतील इतर हितधारकांच्या भागीदारीतून डीजीएफटी मुंबई द्वारे आज मुंबईत ई-कॉमर्स निर्यात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आर के मिश्रा, अतिरिक्त संचालक, डीजीएफटी, अमिताभ सिंग, पोस्टमास्टर जनरल आणि हरीश धारनिया, आयुक्त एअर कार्गो, मुंबई यांनी उपस्थितांना  संबोधित केले, त्यानंतर सीमाशुल्क नियम, इंडिया पोस्टद्वारे पुरवण्यात आलेल्या  सुविधा, अमेझॉन, रिव्हेक्सा , शिपरॉकेट आणि डीएचएल सारखे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यांवर विस्तृत सत्रांचे आयोजन करण्यात आले.

या शिखर परिषदेला 100 हून अधिक निर्यातदार आणि उद्योजक उपस्थित होते.शिखर परिषदेदरम्यान सर्व सहभागींना ई-कॉमर्स व्यापाराच्या विविध पैलूंची माहिती देण्यात आली.

ई-कॉमर्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या संधी कशा उपलब्ध आहेत हे आयोजकांनी स्पष्ट केले. शिखर परिषदेदरम्यान मिळालेला प्रतिसाद ई-कॉमर्स निर्यातीला चालना देण्यासाठी आणि नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याबाबत समस्या दूर करण्यासाठी आणि धोरणे आखण्यासाठी उपयुक्त ठरेल. डीजीएफटी मुंबईतर्फे महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही असे आणखी कार्यक्रम आखले जात आहेत.


S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2025409) Visitor Counter : 64


Read this release in: English