अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

न्हावा शेवा येथे विशेष गुप्तचर आणि तपास शाखेच्या (आयात) अधिकाऱ्यांनी 5.7 कोटी रुपये किमतीची 112 मेट्रिक टन सुपारीची खांडं (अरेका नटस) केली जप्त

Posted On: 12 JUN 2024 10:00PM by PIB Mumbai

मुंबई, 12 जून 2024

सुपारी (अरेका नट्स) तस्करी प्रकरणात न्हावा शेवाच्या जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस येथे एसआयआयबी (I) अर्थात विशेष गुप्तचर आणि तपास शाखेच्या (आयात) अधिकाऱ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी कारवाई केली. दहा कंटेनरमधली  112.14 मेट्रिक टन सुपारी  जप्त केली. आयात कागदपत्रांमध्ये त्याची नोंद "बिटुमेन" अशी करत दिशाभूल  करण्यात आली होती.  आजच्या कारवाईत सुमारे 5.7 कोटी रूपये किमतीची सुपारी  जप्त करण्यात आली.  या प्रकरणात अंदाजे 6.27 कोटी रूपयांचा कर चुकवण्यात आला आहे.

सामान्यपणे बिटुमन ठेवले जाणाऱ्या कंटेनरमध्ये ही सुपारी  ठेवल्याचं बारकाईनं तपासणी केल्यावर आढळले. सुपारी चे CTH 08028090 अंतर्गत योग्यरित्या वर्गीकरण केले आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी 110% अधिक एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST) ची उच्च दर मूल्य आणि शुल्क अशी त्याची संरचना आहे. त्यामुळे भारतात याची तस्करी करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब तस्करांकडून केला जातो. या प्रकरणाचा सध्या पुढील तपास सुरू आहे. सामान्यपणे सुपारी  पिशव्यांमधून आयात केली जाते  तर बिटुमेन कंटेनरमधून. भारतातल्या कस्टम्स अधिकाऱ्यांना गुंगारा देण्यासाठी अरेका नटस कंटेनरमधल्या ड्रममधून आणले गेले.

विदेशी पुरवठादाराने संपूर्ण नियोजन आणि अंमलबजावणी केल्याचे यावरून दिसून येते. हे सुसंघटित आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्याचे द्योतक आहे. त्याचा छडा लावण्यासाठी  एसआयआयबीच्या (आयात) पथकाने अथक परिश्रम घेतले. जवाहरलाल नेहरू बंदर, न्हावा शेवा येथे अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी हे पथक कार्यरत आहे.  

भारत हा जगातील सर्वात मोठा सुपारी उत्पादक असूनही देशातील अवैध गुटखा उद्योगासाठी सुपारीची तस्करी केली जाते.

 N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2024857) Visitor Counter : 67


Read this release in: English