माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणीला 12 जून 2024 पर्यंत मुदतवाढ

Posted On: 10 JUN 2024 7:39PM by PIB Mumbai

 मुंबई, 10 जून 2024

आगामी 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (मिफ्फ) माध्यम प्रतिनिधी नोंदणीची मुदत 12 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मिफ्फ चे आयोजन 15 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीत होणार आहे. माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी, https://my.miff.in/participate/media वर क्लिक करा.


नोंदणी तपशील


माध्यमांसाठी नोंदणी विनामूल्य आहे. तुम्ही https://miff.in/ वर माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करू शकता किंवा नोंदणीसाठी खालील QR कोड स्कॅन करू शकता:


 

नोंदणी प्रक्रियेसाठी तुम्हाला लॉगिन आयडी बनवून, तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील भरून  माध्यम प्रतिनिधी पाससाठी विनंती सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची योग्य छाननी केल्यानंतर, सर्व पात्र माध्यम प्रतिनिधींना पास जारी केले जातील. महाराष्ट्रातील मुंबई येथील पेडर रोडवरील एनएफडीसी- एफडी संकुलातून 14 जून 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मीडिया पास घेता येतील.


त्यामुळे,जर तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल, तर आयुष्यभराचा अनुभव घेण्याची ही संधी गमावू नका. मिफ मधील वैविध्यपूर्ण माध्यमांची उपस्थिती या कार्यक्रमाची केवळ शोभा वाढवत नाही, तर त्याची प्रतिष्ठा वाढवते, तसेच विद्यार्थी, आकांक्षी कलाकार, नवोदित चित्रपट निर्माते आणि चित्रपट रसिकांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणूनही काम करते!


18 व्या मिफ 2024 विषयी


दक्षिण आशियातील नॉन-फिचर फिल्म करिता सर्वात जुना आणि सर्वात भव्य चित्रपट महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिफ चे माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांची कला प्रदर्शित करण्याचे हे 18 वे वर्ष आहे. वर्ष 1990 मध्ये सुरू झालेला आणि आता भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत आयोजित केला जाणारा मिफ जगभरातील सिनेप्रेमींना आकर्षित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात विकसित झाला आहे.


या वर्षीचा महोत्सव देखील खास असेल कारण 38 पेक्षा जास्त देश सहभागी झाले असून, 1018 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत आणि देशभराचे पटल व्यापणाऱ्या या महोत्सवाचे प्रदर्शन दिल्ली, कोलकाता, पुणे आणि चेन्नई येथे देखील होणार आहे.


18 वा मिफ हा आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या विस्तृत निवडीसह वर्क इन प्रोग्रेस लॅब, को-प्रॉडक्शन मार्केट्स आणि व्ह्यूइंग रूम यांचा समावेश असणाऱ्या पहिल्याच डॉक्युमेंटरी फिल्म बाजार सारख्या अत्युच्च दर्जाच्या कार्यक्रमांच्या विस्तृत श्रेणीद्वारे चित्तवेधक ठरेल. सिनिअर वॉर्नर ब्रदर ॲनिमेटरद्वारे एक विशेष ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स पाइपलाइन कार्यशाळा देखील आयोजित केली जात आहे. प्रस्थापित आणि उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शकांमध्ये अध्ययनाची गतिशील देवाणघेवाण करण्यासाठी पॅनल चर्चा, ओपन फोरम, फायरसाइड चॅट आणि शीर्ष चित्रपट उद्योग तज्ञांच्या मास्टरक्लास सारखे खास निवडक कार्यक्रम देखील आहेत. या व्यतिरिक्त पत्रकार परिषदा आणि निवडक मुलाखतींद्वारे माध्यम प्रतिनिधींना त्यांच्या आवडत्या माहितीपट निर्माते आणि कलाकारांना जवळून आणि वैयक्तिकरित्या भेटण्याची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी https://miff.in ला भेट द्या.

 

 

PIB Team MIFF | N.Chitale/V.Joshi/P.Malandkar | 02

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2023820) Visitor Counter : 128


Read this release in: English