माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सहा दिवसीय अर्जेंटिना आणि एनएफडीसी चित्रपट महोत्सवाची सांगता

Posted On: 01 JUN 2024 8:39PM by PIB Mumbai

 

अर्जेंटिना आणि एनएफडीसी चित्रपट महोत्सवाचा आज मुंबईत एका भव्य कार्यक्रमात समारोप झाला. महोत्सवाचे सहा दिवस  उत्कृष्ट चित्रपट आणि सांस्कृतिक संगमाचा उत्सव साजरा करण्यात आला.  या अनोख्या महोत्सवात अर्जेंटिनाचे तीन चित्रपट आणि एनएफडीसीचे तीन चित्रपट दाखविण्यात आले. त्यासाठी संपूर्ण मुंबईतील चित्रपट रसिक आणि सांस्कृतिक प्रेमी एकत्र जमले होते.

या महोत्सवाची सुरुवात हर्नान ओहाको यांच्या प्रेरणादायी मास्टरक्लासने झाली. यामध्ये  एनएफडीसीच्या  आवारातील भारतीय चित्रपट संग्रहालय (NMIC) च्या असंख्य अभ्यागतांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

हा चित्रपट महोत्सव म्हणजे एनएफडीसी च्या चित्रपटांचे जतन आणि प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांची फक्त सुरुवात आहे, असे आजच्या समारोप समारंभात एनएफडीसीचे मुख्य व्यवस्थापक डी. रामकृष्णन यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीसाठी भविष्यात अधिक देशांसोबत भागीदारी करण्यासाठी एनएफडीसीची बांधिलकी सामायिक करत त्यांनी  चित्रपटांमुळे तयार होणाऱ्या भावनिक संबंधावर भर दिला.  श्रोत्यांनी वारंवार सहभाग आणि पाठिंबा नोंदवल्याबद्दल रामकृष्णन यांनी त्यांचे आभार मानले.  जागतिक दूध दिनानिमित्त, एनएफडीसी ने "मंथन" चित्रपट प्रदर्शित केला. हा चित्रपट भारतातील डेअरी समुदायाच्या परिवर्तनीय शक्तीचा उत्सव साजरा करतो आणि सोबतच सहकार्य आणि ग्रामीण विकासाचे महत्त्व अधोरेखित करतो.  अर्जेंटिना आणि एनएफडीसी चित्रपट महोत्सवाने केवळ विविध प्रकारच्या चित्रपटांचे प्रदर्शन केले नाही तर राष्ट्रांमधील सामायिक भावना आणि सांस्कृतिक संबंध अधोरेखित केले . हा महोत्सव आंतरराष्ट्रीय चित्रपट सहयोगातील महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2022492)
Read this release in: English