ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून निमशासकीय आणि सहकारी संस्थांना गहू आणि बिगर -फोर्टिफाईड तांदळाच्या अतिरिक्त साठ्याचे वितरण
भारत ब्रँड अंतर्गत सर्वसामान्य ग्राहकांना गहू आणि बिगर -फोर्टिफाइड तांदूळ विक्री योजनेला 30.06.2024 पर्यंत मुदतवाढ
Posted On:
17 MAY 2024 2:56PM by PIB Mumbai
मुंबई, 17 मे 2024
गहू / पीठाच्या वाढत्या किमती कमी करता याव्यात या उद्देशाने ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने केंद्रीय भांडार / राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ ) / नाफेड अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महामंडळ इंडिया लिमिटेड/ महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड (एमएससीएमएफएल) अशा निमशासकीय आणि सहकारी संस्थांना खुला बाजार विक्री योजनेअंतर्गत (प्रादेशिक) गव्हाच्या अतिरिक्त साठ्याची तरतूद केली होती.यासंदर्भात 19. 10. 2023 रोजी जारी करण्यात आलेल्या पत्राद्वारे वितरीत केलेल्या गव्हाचे पीठ तयार करून त्याची 'भारत आटा' या ब्रँडअंतर्गत सर्वसामान्य ग्राहकांना विक्री करावी असे निर्देश दिले गेले होते.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिनांक 18. 01. 2024 रोजी देखील एक पत्र पाठवले होते. या पत्राद्वारे विभागाने केंद्रीय भांडार / एनसीसीएफ / नाफेड / महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड अशा निमशासकीय आणि सहकारी संस्थांना खुला बाजार विक्री योजनेअंतर्गत (प्रादेशिक) [ (OMSS (D) ] "भारत राईस / भारत चावल" ब्रँडअंतर्गत सामान्य ग्राहकांना विकण्यासाठी बिगर - फोर्टिफाइड तांदळाचे अतिरिक्त तरतूद केली होती.
या अनुषंगाने भारतीय अन्न महामंडळही धान्यसाठा उपलब्ध राहील याची सुनिश्चिती करण्यासाठी दळणवळणाची सुनियोजित व्यवस्थाही राखत आहे. त्यानंतर हा साठा या वर नमूद यंत्रणांना दिलेल्या सूचनांनुसार,'भारत' या ब्रँडअंतर्गत वितरणासाठी पुरवला जात आहे. त्यानंतर संबंधित यंत्रणाद्वारे हा साठा मंत्रालयाने वितरणासाठी आखून दिलेल्या मर्यादेत निश्चित केलेल्या ठिकाणी नियमांनुसारच पुरवला जात आहे.
सुरुवातीला या योजना 31. 03. 2024 पर्यंत लागू होत्या, मात्र त्यानंतर या योजनांना 30. 06. 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळद्वारे या संबंधित संस्थांना गहू 17.15 / रुपये किलो दराने आणि तांदूळ 18.59 / रुपये किलो दराने उपलब्ध करून दिला जात आहे. त्यानंतर या संस्थांद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना 5 किलो / 10 किलोच्या पाकिटांमध्ये पीठ 27.50 / रुपये प्रति किलो आणि तांदूळ 29 / रुपये प्रति किलो दराने विकण्याची व्यवस्था आहे.
दिनांक 15. 05. 2024 पर्यंत मंत्रालयाकडून या संस्थांना 2 लाख 51 हजार 220 मेट्रिक टन गहू आणि 2 लाख 03 हजार 531 मेट्रिक टन तांदूळ वितरीत केला गेला आहे, यासोबतच या संस्थांनी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमधून 1 लाख 47 हजार 900 मेट्रिक टन गहू आणि 83 हजार 113 मेट्रिक टन तांदळाचा साठा स्वतःहून घेतला आहे.
S.Kakade/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2020879)
Visitor Counter : 111