दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'ऑक्शन ऑफ स्पेक्ट्रम इन 37-37.5 GHz, 37.5-40 GHz अँड 42.5-43.5 GHz बँडस आयडेंटिफाइड फॉर आयएमटी' या विचारविनिमय पत्रावर टिप्पण्या / प्रतिवाद पाठवण्यासाठीच्या मुदतीत ट्रायकडून वाढ

Posted On: 16 MAY 2024 8:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2024

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे रेडिओ नियमन/अद्ययावत एनएफएपी अर्थात नॅशनल फ्रिक्वेन्सी अलोकेशन प्लॅनच्या संबंधित तरतुदींमध्ये स्पष्ट करण्यात आलेल्या नियामक तांत्रिक आवश्यकतांसह 37-37.5 GHz, 37.5-40 GHz आणि 42.5-43.5 GHz बँडमध्ये इतर बाबींसह स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी संबंधित अटी आणि लिलाव करावयाच्या स्पेक्ट्रमचे प्रमाण, प्रयोज्य राखीव किंमत, बॅण्ड योजना, ब्लॉक आकार यावर शिफारसी पुरवण्याची विनंती दूरसंचार विभागाने ट्रायला केली होती. यासाठी विभागाने ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला 02.08.2023 रोजी पत्र पाठवले होते.

यासंदर्भात ट्रायने 04.04.2024 रोजी  'ऑक्शन ऑफ स्पेक्ट्रम इन 37-37.5 GHz, 37.5-40 GHz अँड 42.5-43.5 GHz बँडस आयडेंटिफाइड फॉर आयएमटी' असे पत्र विचारविनिमयासाठी ( कन्सल्टेशन पेपर)प्रसिद्ध केले. सुरुवातीला, कन्सल्टेशन पेपरमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर हितधारकांकडून लेखी टिप्पण्या आणि प्रतिवाद  प्राप्त करण्याची अंतिम मुदत अनुक्रमे 02.05.2024 आणि 16.05.2024 अशी निश्चित करण्यात आली होती. तथापि, उद्योग आणि संघटनांच्या विनंतीवरून, ही मुदत अनुक्रमे 16.05.2024 आणि 30.05.2024 पर्यंत दोन आठवड्यांनी वाढवण्यात आली.

उद्योग संघटनांची, टिप्पण्या आणि प्रतिवाद  सादर करण्यासाठी मुदत आणखी वाढवण्याची विनंती लक्षात घेऊन, लेखी टिप्पण्या आणि प्रतिवाद  सादर करण्याची अंतिम मुदत  अनुक्रमे 24 मे 2024 आणि 6 जून 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुदतवाढीसाठी पुढील कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.

टिपण्या/प्रतिवाद शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात advmn@trai.gov.in या ईमेल आयडीवर पाठवाव्यात. कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीसाठी, अखिलेश कुमार त्रिवेदी, सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना), ट्राय, यांच्याशी दूरध्वनी क्रमांक +91-11-23210481 वर संपर्क साधता येईल.

S.Kane/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2020834) Visitor Counter : 102


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil