कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयसीएआर-सीसीएआरआयतर्फे आंतरराष्ट्रीय कामगार दिन “श्रमिक सन्मान दिवस” म्हणून साजरा

Posted On: 03 MAY 2024 2:25PM by PIB Mumbai

गोवा, 3 मे 2024

 

गोव्यातील एला परिसरात असलेल्या आयसीएआर-केंद्रीय तटवर्ती कृषी संशोधन (सीसीएआरआय) या संस्थेच्या सर्व विभाग/ एककांमध्ये कार्यरत कामगारांनी संस्थेच्या विकासात दिलेल्या योगदानाचा सन्मान करून त्यांची प्रशंसा करण्याच्या उद्देशाने 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन’2024 निमित्त “श्रमिक सन्मान दिवस” साजरा केला.या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा सरकारमधील समाज कल्याण विभाग सचिव आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुभाष चंद्र तर यूएन-एफएओ चे सल्लागार डॉ.जे.आर.फलेरो हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांनी त्यांच्या सूचना मांडल्या तसेच मते व्यक्त केली आणि कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांच्या संदर्भात आलेले अनुभव सहभागींशी सामायिक केले.

सर्व सन्माननीय प्रतिनिधींसह, आयसीएआर सीसीएआरआयचे संचालक डॉ.परवीन कुमार यांनी याप्रसंगी कामगारांच्या प्रत्यक्ष भूमीवरील कार्याचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार दिन 2024 साठी निश्चित केलेल्या “बदलत्या हवामानात कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य यांची सुनिश्चिती” या संकल्पनेला सुयोग्य अशा हॅट प्रदान केल्या. संस्थेच्या परिसरात कामगारांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम तसेच त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या, आरोग्य केंद्र, कामगारांच्या मुलांसाठी मोफत शिकवणी आणि त्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्वयंसेवी मदत इत्यादींसारख्या सोयीसुविधा याबद्दल त्यांनी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली. सीसीएआरआयने अशा समावेशक आणि व्यापक पद्धतीने श्रमिक सन्मान दिवस  केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी संस्थेचे कौतुक केले. कृषी विज्ञान केंद्राचे ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख डॉ.एन.बोम्मयसामी यांनी देखील यावेळी कामगारांशी संवाद साधला. संस्थेचे कृषी अधीक्षक आणि समन्वयक विनोद उबरहांडे यांनी ही संस्था नेहमीच कामगारांच्या अधिकारांचे रक्षण करत राहील अशी ग्वाही देतानाच, सर्वांनी आपलेपणाच्या भावनेने आणि अत्यंत प्रामाणिकपणे आपापली कर्तव्ये पाडायला हवी याची कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आठवण करून दिली.

याप्रसंगी, यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून आयपीएस अधिकारी झालेल्या मनोज कुमार शर्मा यांच्या यशापासून प्रेरणा मिळावी तसेच शर्मा यांच्या या वाटचालीत त्यांना मिळालेले प्रोत्साहन तसेच त्यांचा संघर्ष यांची माहिती कामगारांना तसेच त्यांच्या मुलांना व्हावी या उद्देशाने “ ट्वेल्थ फेल” या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक, हाऊसकीपिंग करणारा कर्मचारीवर्ग, प्रकल्प कर्मचारी, तरुण व्यावसायिक आणि संस्थेच्या कर्मचारी सदस्यांसह एकूण 200 जण या कार्यक्रमाला उपस्थित होते. एसीटीओ राहुल कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात मदत केली तसेच आभारप्रदर्शन देखील केले. तंत्रज्ञान अधिकारी विश्वजित प्रजापती यांनी या कार्यक्रमासाठी तंत्रज्ञानविषयक पाठबळ दिले.

 

* * *

PIB Panaji | S.Patil/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 2019540) Visitor Counter : 84


Read this release in: English