अर्थ मंत्रालय

तस्करी करून आफ्रिकेतून मुंबईत आणलेले सोने आणि चांदी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली जप्त

Posted On: 24 APR 2024 2:45PM by PIB Mumbai

मुंबई, 24 एप्रिल 2024

आफ्रिकेतून तस्करी करून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे आणलेल्या सोन्यावरील विदेशी छाप काढून टाकून  वितळण्याची प्रक्रिया करून ते स्थानिक बाजारपेठेकडे विकायला वळवले जात असल्याच्या गुप्तचर विभागाकडे आलेल्या माहितीच्या विशिष्ट आधारानुसार , महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने 22 एप्रिल 2023 रोजी कारवाई सुरू केली.

त्यानुसार, डीआरआय मुंबई विभागातील युनिटच्या अधिकाऱ्यांनी सोने वितळविण्याच्या या जागेची झडती घेतली आणि मूळ विदेशी सोने आणि 16.66 किलो चांदीसह 9.31 किलो सोने जप्त केले.

तसेच,वाहकांची व्यवस्था करणारा आणि पुढील प्रक्रियेसाठी तस्करी केलेले सोने गोळा करून वितळवणारा इसम (मेल्टिंग फॅसिलिटी ऑपरेटर) आणि रिक्रुटर (टोळीतील एक प्रमुख सदस्य) यांनाही ताब्यात घेण्यात आले.

चौकशी केल्यावर असे उघडकीस आले,की रिक्रुटर अनेक आफ्रिकन नागरिकांनी तस्करी करून आणलेले  सोने गोळा करतो, त्यावर प्रक्रिया करून जवळच्या सोने विक्रेत्यांना देतो.

पाठपुरावा करण्यासाठी रिक्रुटरच्या  कार्यालयाच्या आवारात शोध घेतला असता 190000 अमेरिकेन डॉलर्स  सापडले, जे या खरेदीदाराने तस्करीच्या सोन्याचे आगाऊ पैसे म्हणून त्याच्याकडे दिले होते.

त्याच बरोबर आणखी एक पथक खरेदीदाराच्या जागेच्या परिसराच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. मात्र, अधिकारी पोहोचण्यापूर्वीच खरेदीदार पळून गेला होता. झडतीदरम्यान 351 ग्रॅम विदेशी सोन्याचे तुकडे आणि 1818 ग्रॅम चांदीसह  1.91 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

अधिक चौकशी केली असता असे उघड झाले, की ज्या आफ्रिकन नागरिकांकडून या इसमाने  सोने गोळा केले आहे ते जवळच्या दोन हॉटेलांमध्ये राहत आहेत. त्यामुळे, दोन पथके रवाना करण्यात आली आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या आणि रिक्रुटरकडे देणाऱ्या 2 आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली.

सर्व 4 व्यक्ती म्हणजेच  2 वाहक, सोने नेआण करणारा आणि सोने वितळवणारा  यांनी भारतात सोन्याच्या तस्करीत सहभाग असल्याचे कबूल केल्याने  सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2018709) Visitor Counter : 47


Read this release in: English