माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाकडून ‘क्रॉनिकल्स ऑफ टाईमलेस ट्रेझर्स’चे सादरीकरण

Posted On: 20 APR 2024 8:39PM by PIB Mumbai

 

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनएफडीसी) अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाअंतर्गत भारतीय चित्रपटांचे राष्ट्रीय संग्रहालय (एनएमआयसी) 'क्रॉनिकल्स ऑफ टाइमलेस ट्रेझर्स' या प्रतिष्ठेच्या मालिकेचा भाग म्हणून 'ज्वेल थीफ' या गाजलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करताना असताना अतिशय उत्साहित झाले होते. दर शनिवारी संध्याकाळी 4 वाजता, चित्रपट रसिकांना एन. एम. आय. सी. येथे पुनरुज्जीवित अभिजात सिनेमाच्या वैभवाचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

ज्वेल थीफहा विजय आनंद यांचा 1967 मध्ये बनवलेला, अतिशय गाजलेला चित्रपट हा भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वोत्तम रहस्यपटांपैकी एक मानला जातो.  पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या समर्पित प्रयत्नांनी अतिशय काळजीपूर्वक पुनरुज्जीवित करण्यात आलेली ही अभिजात कलाकृती, चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्तम गुणवत्तेच्या युगात प्रेक्षकांना पुन्हा घेऊन जाण्याची हमी देते. हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम संस्मरणीय बनवण्यासाठी ईशा गुप्ता यांना एनएमआयसीने प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सर्वोत्तम सिनेप्रतिभेच्या सन्मानाच्या या सोहळ्याची शोभा आणि महत्त्व आणखी वाढले.

या प्रयत्नांविषयी बोलताना ईशा गुप्ता म्हणाल्या, “एनएफडीसी-एनएमआयसी - एनएफएआयने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे जुन्या पिढीसोबत युवा पिढीला देखील भारतीय चित्रपटाच्या या वैभवशाली वारशाची जाणीव होईल. चित्रपट निर्मितीच्या तंत्रामधील विरोधाभासाबाबत त्यांनी चित्रपट क्षेत्रातील एक म्हणून आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “ वैजयंतीमाला यांची एक चाहती म्हणून, ज्यावेळी मी ज्वेल थीफहा चित्रपट या ठिकाणी पाहिला, त्यावेळी त्यांचे नैसर्गिक सौंदर्य पाहून आणि ज्या प्रकारे पूर्वीच्या काळातील नायिका त्यांचा मनमोहकपणा, अदाकारी सादर करायच्या, ते पाहून मी चकित झाले.

या प्रदर्शनासोबत एनएमआयसीने कॅप्चर युवर मुमेंट नावाच्या एका स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये अभ्यागतांना हे संग्रहालय पाहण्यासाठी आणि संस्थेच्या सहकार्याने रील्स बनवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. विजेत्या प्रवेशिकांची निवड ईशा गुप्ता यांनी स्वतः केली. या संग्रहालयाला भेट देण्याची आणि त्यांच्या आवडत्या अभिजात कलाकृतीच्या पुनरुज्जीवनाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याबद्दल ईशा गुप्ता यांनी आनंद व्यक्त केला.

***

M.Pange/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2018363) Visitor Counter : 65


Read this release in: English