अणुऊर्जा विभाग
जॉर्जियात स्काल्तुबो येथे आयोजित मुलींसाठीच्या 13व्या युरोपियन गणित ऑलिम्पियाड (ईजीएमओ) 2024 मध्ये भारतीय संघाने पटकावली 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके
Posted On:
17 APR 2024 7:15PM by PIB Mumbai
मुंबई, 17 एप्रिल 2024
जॉर्जियात स्काल्तुबो येथे आयोजित मुलींसाठीच्या 13व्या युरोपियन गणित ऑलिम्पियाड (ईजीएमओ),2024 मध्ये भारतीय संघाने प्रशंसनीय कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे.
भारताच्या चार सदस्यीय संघाने 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे.
पदकविजेते खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:
चेन्नई मॅथेमॅटीकल इन्स्टीटयूटचे साहिल म्हसकर (प्रमुख), अदिती मुथखोड (उपप्रमुख) आणि अनन्या रानडे (निरीक्षक) यांनी भारतीय पथकाचे नेतृत्व केले असून त्यांचे मार्गदर्शन आणि मदत भारतीय पथकाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. वर्ष 2015 मध्ये भारतीय संघाने ईजीएमओ मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता, त्यानंतर या स्पर्धेत उतरलेल्या सर्वच्या सर्व चारही स्पर्धकांनी पदके मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे.
गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र तसेच कनिष्ठ विज्ञान या विषयांतील ऑलिम्पियाड कार्यक्रमांसाठी भारतातील नोडल संस्था म्हणून काम करणाऱ्या टीआयएफआर- होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने (एचबीसीएसई) या यशाचे श्रेय याआधीच्या स्पर्धांतील पदक विजेत्या खेळाडूंचे समर्पित प्रयत्न, तसेच एचबीसीएसई तर्फे ईजीएमओ प्रशिक्षण शिबिराच्या (ईजीएमओटीसी) माध्यमातून स्पर्धकांना देण्यात आलेले संरचित प्रशिक्षण आणि ऑलिम्पियाड कार्यक्रमाच्या कालावधीत केंद्रीय अणुउर्जा विभागाच्या (डीएई) अखत्यारीतील राष्ट्रीय उच्चस्तरीय गणित मंडळातर्फे देण्यात आलेला सातत्यपूर्ण पाठींबा या सर्व घटकांना दिले आहे.
केंद्रीय अणुउर्जा विभागाच्या (डीएई) अखत्यारीतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने (एचबीसीएसई) -टीआयएफआर ही प्रमुख संस्था भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र तसेच गणित या विषयांतील प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या प्रतिभावंत स्पर्धकांची निवड करुन, योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना या स्पर्धांसाठी तयार करण्यासाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करते. त्यासाठी भारत सरकारतर्फे मान्यताप्राप्त आणि सरकारच्या पाठबळाने एचबीसीएसई अत्यंत काळजीपूर्वक राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा म्हणजे स्पर्धकांना विविध टप्प्यांतून प्रगती करत अंतिम संघात प्रतिष्ठित स्थान निश्चित करण्यासाठीचा मार्ग आहे.
ईजीएमओ 2024 साठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे उद्या, 18 एप्रिल, 2024 रोजी पहाटे मुंबईत आगमन होणार आहे. भारतीय संघाने मिळवलेले हे यश साजरे करण्यासाठी एचबीसीएसईच्या मुख्य इमारतीत खोली क्र.जी 1 मध्ये उद्या, 18 एप्रिल, 2024 रोजी सकाळी साडेअकरा वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया खालील लिंक्सचा वापर करा:
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/DAE10L2S.jpg)
पदकविजेते डावीकडून उजवीकडे : सई पाटील (कांस्य), लॅरीस्सा (कांस्य), संजना फिलो चाको (रौप्य), गुंजन अगरवाल (रौप्य) सदर छायाचित्र जॉर्जियात स्काल्तुबो येथे कार्यक्रम स्थळी काढले आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/DAE2DAH7.jpg)
प्रमुखांसह संघ सदस्य: स्पर्धक (समोर) आणि प्रमुख (पाठीमागे) पदकविजेते डावीकडून उजवीकडे : गुंजन, अनन्या, सई, साहिल, संजना, अदिती आणि लॅरीस्सा
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2018134)
Visitor Counter : 110