संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नाशिक मध्ये आसाम रायफल्स माजी सैनिक संघ केंद्राचे 21 एप्रिल 2024 रोजी उद्घाटन होणार


माजी सैन्य कर्मचारी रॅली मध्ये आसाम रायफल्सच्या महानिदेशकांची उपस्थिती

Posted On: 15 APR 2024 2:15PM by PIB Mumbai

नाशिक, 15 एप्रिल 2024

आसाम रायफल्स वेटरन्स दिन 23 मार्च 2024 रोजी साजरा झाला. त्यानंतर आता  आसाम रायफल्स महानिदेशालय, आसाम रायफल्स पूर्व सैनिक संघाच्या सहयोगाने , महाराष्ट्रातील आसाम रायफल्स माजी सैनिक संघाच्या नवीन आसाम रायफल्स माजी सैनिक संघ (ARESA) केंद्राचे उद्घाटन होत  आहे. हे महाराष्ट्रातील पहिले ARESA केंद्र आहे ज्यात 107 पूर्व सैनिक आहेत, राज्यातील आसाम रायफल्स वेटरन्सला कल्याण सुविधांची आणि समर्थन सेवांचा पुरवठा करण्यास हे केंद्र समर्पित असणार आहे.

Lt Gen PC Nair interacting with the oldest Gallantry award winner of Assam Rifles Hav Mering AO

लेफ्ट. जनरल प्रदीप चंद्रन नायर, पी वी एस एम, ए वी एस एम, वाय एस एम, पीएच.डी,महा निदेशक आसाम  रायफल्स यांच्या हस्ते  नवीन   केंद्राचे 21 एप्रिल 2024 रोजी उद्घाटन होणार आहे. यानंतर माजी सैनिक रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे. आसाम रायफल्स मध्ये सेवा केलेल्या वेटरन्सच्या योगदानांचा समर्थनासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.  लेफ्टनंट जनरल प्रदीप नायर हे मूळ पुण्याचे नागरिक आहेत आणि त्यांचे शिक्षण सातारा सैनिक शाळेमध्ये झालेले आहे.

DG Assam Rifles Interacts with the Ex-Servicemen During a Rally in Chandimandir

 

ARESA केंद्र माजी सैनिकांनी स्वतः नियोजित केलेले आहेत, ज्यामुळे माजी सैनिकांच्या विशेष नाशिक केंद्राला 111 आसाम रायफल्सच्या माजी सैन्य कर्मचार्यांच्या आणि वीर नारींच्या आवश्यकतांसाठी परवानगी दिली आहे.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी सैन्यकर्मचार्यांना त्यांचे अनुभव सांगण्याची आणि , जुन्या सहकर्मींसह पुन्हा संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे.  देशभरात एकूण 34 ARESA केंद्रे आसाम रायफल्सच्या एक लाखाहून अधिक माजी सैनिकांना मदत करतात.

Lt Gen PC Nair interacting and presenting a assisting device to a Veteran during a rally in Shillong

Lt Gen PC Nair DG AR  alongwith Ex-Servicemen during a Exservicemen rally in Kohima


MI/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2017939) Visitor Counter : 119
Read this release in: English