वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
परकीय व्यापार महासंचालनालय , नागपूर आणि प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (PLEXCONCIL) यांच्या वतीने नागपूर येथे "रोड शो फॉर PLEXCONNECT- 2024" चे आयोजन
Posted On:
11 APR 2024 9:43PM by PIB Mumbai
नागपूर 11 एप्रिल 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूर येथील परकीय व्यापार अतिरिक्त महासंचालनालय कार्यालय आणि प्लॅस्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (PLEXCONCIL) च्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे "रोड शो फॉर PLEXCONNECT- 2024" चे आयोजन 12 एप्रिल 2024, शुक्रवार रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे. परकीय व्यापार महासंचालक (DGFT) प्रादेशिक क्षेत्र नागपूर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अधिका-यासह स्नेहल ढोके, (भारतीय व्यापार सेवा,) असिस्टंट डीजीएफटी नागपूर, . जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) नागपूरचे महाव्यवस्थापक एस.एस मुद्दमवार आणि एमएसएमई नागपूरचे सहायक संचालक राहुल मिश्रा उपस्थित राहणार आहेत.
मध्यम सूक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये मध्ये प्लास्टिक निर्यातीच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि PLEXCONNECT 2024 सारख्या जागतिक स्तरावरील प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याच्या फायद्यांविषयी माहिती देण्यासाठी हा रोड शो आयोजित करण्यात आला आहे, हे प्रदर्शन मुंबईत 7 ते 9 जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे ज्यामध्ये आफ्रिकेतील खरेदीदार , दक्षिण आशिया, आशियान लॅटिन अमेरिका रशिया), इजिप्त), युरोप , आणि उत्तर अमेरिकेतील उद्योजक सहभागी होणार आहेत.
PLEXCONCIL ही प्लास्टिक उत्पादनांसाठी निर्यात प्रोत्साहन परिषद आहे आणि ती भारतातील प्लास्टिक उद्योगाची सर्वोच्च संस्था आहे . हि संस्था 2,900 पेक्षा जास्त निर्यातदारांचे प्रतिनिधित्व करते जे प्लॅस्टिकच्या कच्च्या मालापासून प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन/निर्यात करतात. मोठ्या संख्येने प्लास्टिक उत्पादक, व्यापारी, निर्यातदार या रोड-शो कार्यक्रमात उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे आणि त्यांना निर्यातीबद्दल प्लास्टिक आणि संबंधित उत्पादनासंदर्भात माहिती मिळणार आहे.

***
S.Rai/D.Wankhede/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2017687)