संरक्षण मंत्रालय
249 वा आर्मी ऑर्डनन्स कोअर दिन साजरा: 08 एप्रिल 2024
Posted On:
08 APR 2024 6:07PM by PIB Mumbai
पुणे, 8 एप्रिल 2024
आर्मी ऑर्डनन्स कोअर (AOC) ने दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी त्यांचा दोनशे एकोणपन्नासावा स्थापना दिवस साजरा केला.

या महत्त्वाच्या समारंभाला, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह , पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जीओसी-इन-सी, दक्षिण विभाग यांनी आर्मी ऑर्डनन्स कोअरच्या सर्व श्रेणीतील अधिकारी आणि जवानांचे अभिनंदन केले तसेच भारतीय सैन्याला उच्च दर्जाच्या आयुधांची रसद पुरवण्याच्या त्यांच्या व्यावसायिकतेचा आणि वचनबद्धतेचा गौरव केला. आर्मी ऑर्डनन्स कोअर 1775 मध्ये 'बोर्ड ऑफ ऑर्डनन्स' म्हणून अस्तित्वात आले आणि त्यांच्यावर सैन्याला शस्त्रे, दारूगोळा आणि उपकरणे यांचे पद्धतशीर वितरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. स्थापनेनंतर, 'बोर्ड ऑफ ऑर्डनन्स' मध्ये अनेक बदल झाले, आणि ते 1922 मध्ये इंडियन आर्मी ऑर्डनन्स कोअर म्हणून ओळखले जाऊ लागले. भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर 1950 मध्ये त्यातील 'भारतीय' हे विषेश नाम वगळण्यात आले. संस्थेला आता ‘आर्मी ऑर्डनन्स कोअर’ म्हणून संबोधले जाते आणि भारतीय सैन्याला उपकरणे, सुटे सामान आणि दारूगोळा यांची ने-आण करण्याची याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.
M.Iyengar/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2017449)
Visitor Counter : 88