शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्पेक्ट्रम 24 : विविधता आणि सर्जनशीलतेचा उत्सव

Posted On: 07 APR 2024 12:53PM by PIB Mumbai

 

मुंबईमध्ये अलीकडेच 5 आणि 6 एप्रिल 2024 रोजी स्पेक्ट्रम 24 या एऩआयएफटी मुंबईच्या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये एनआयएफटी आणि इतर प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा, वादसंवाद, फॅशन शोसाहित्य आणि इतर क्षेत्रांमधील आपली गुणवत्ता आणि आवड यांचे दर्शन घडवले.

नवी मुंबई परिमंडळाचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून आणि सोसायटी फॉर इमर्जन्सी मेडिसिन इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. संदीप गोरे यांच्या सन्माननीय अतिथी म्हणून  उपस्थितीत या महोत्सवाचा प्रारंभ झाला.

या महोत्सवाच्या केंद्रस्थानी ब्लॉब नावाचा एक गतिशील शुभंकर होता जो अष्टपैलुत्व आणि समावेशकता यांचे प्रतीक होता. या महोत्सवातील उत्सवी कार्यक्रमांव्यतिरिक्त यामध्ये कार्यशाळा आणि मीना बाजार ही बाजारपेठ देखील आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य आणि सर्जनशील उपक्रमांचे प्रदर्शन करण्याची संधी देण्यात आली होती.

***

S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2017370) Visitor Counter : 105


Read this release in: English