संरक्षण मंत्रालय
रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाच्य शिष्टमंडळाची मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांडसोबत भेट
Posted On:
06 APR 2024 12:51PM by PIB Mumbai
रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीचे प्रमुख AO व्हाइस ॲडमिरल मार्क हॅमंड यांच्या नेतृत्वाखाली रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (RAN) च्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाने 05 एप्रिल 24 रोजी मुंबईच्या वेस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली.

या शिष्टमंडळाने 05 एप्रिल 24 रोजी AVSM, NM, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग, यांच्याशी संवाद साधला आणि दोन्ही नौदलांमधील परस्पर हितसंबंध आणि परस्पर कार्यक्षमतेच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
या शिष्टमंडळाला वेस्टर्न नेव्हल कमांडच्या भूमिका आणि सनद आणि सागरी क्षेत्रातील सध्याच्या आव्हानांचा आढावाही देण्यात आला. लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांना वेस्टर्न फ्लीटच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

शिष्टमंडळाने नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे स्वदेशी बनावटीच्या संहारक आणि पाणबुडीलाही भेट दिली. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (MDL) च्या त्यांच्या भेटीदरम्यान या शिष्टमंडळाला यार्डच्या क्षमतेबद्दल आणि भारतीय नौदलासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांबद्दल माहिती देण्यात आली.

***
GSK/S.Khekade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2017313)