कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
सीबीआय च्या एका गुन्ह्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पश्चिम रेल्वेच्या विभागीय अभियंत्याला न्यायालयाने ठोठावली सक्तमजुरीची शिक्षा
प्रविष्टि तिथि:
28 MAR 2024 8:30PM by PIB Mumbai
मुंबई , 28 मार्च 2024
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज, मुंबईतील पश्चिम रेल्वे विभागातील इलेक्ट्रिकल अभियंता (ऊर्जा) के. एल. मीणा याला लाचखोरीच्या खटल्यात दोषी ठरवत, तीन वर्षांची सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
पश्चिम रेल्वेच्या डीईई विभागात, इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या के. एल. मीणा यांना एका व्यक्तीला कंत्राट देण्याच्या बदल्यात, 3 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार सीबीआयने 15 एप्रिल 2015 रोजी दाखल केली होती. सीबीआयने सापळा रचून, 24 एप्रिल 2015 रोजी लाचखोर अधिकाऱ्याला तक्रारदाराकडून, 1 लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते.
सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने 13 ऑक्टोबर 2015 रोजी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर, 29 सप्टेंबर 2016 रोजी, त्यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले.
खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने, अधिकाऱ्याला दोषी ठरवत शिक्षा जाहीर केली. या खटल्यात सीबीआयने 12 साक्षीदार न्यायालयासमोर हजर केले होते.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2016600)
आगंतुक पटल : 89
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English