अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवडणूक काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबईच्या प्राप्तिकर विभागाने स्थापन केला पूर्णवेळ नियंत्रण कक्ष


नागरिक यावर दूरध्वनी, व्हॉट्सॲप/ पत्र किंवा ई मेल द्वारे नोंदवू शकतील माहिती आणि तक्रारी

Posted On: 21 MAR 2024 4:58PM by PIB Mumbai

 

मुंबई , 21 मार्च 2024

आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पैशांचा गैरवापर रोखता यावा यासाठी उपाययोजना करण्यास, मुंबईतील प्राप्तिकर विभाग कटिबद्ध आहे. मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका व्हाव्यात, यासाठी, मुंबई प्राप्तिकर विभागाने, निवडणुकांच्या खर्चावर देखरेख ठेवता येईल,यासाठी 24x7 म्हणजेच पूर्णवेळ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मुंबईतील निवडणुक मतदान होईपर्यंत, म्हणजे 20 मे 2024 पर्यंत हा कक्ष कार्यरत राहील. या नियंत्रण कक्षात सजग नागरिक या कक्षाला, पैशांचे अथवा मौल्यवान वस्तूंच्या व्यवहाराबद्दल माहिती देऊ शकतात.माहिती देण्यासाठीचे टोल फ्री क्रमांक, व्हॉट्स ॲप क्रमांक/ दूरध्वनी क्रमांक आणि ई मेल पुढील प्रमाणे आहेत :

टोल फ्री क्रमांक : 1800-221-510

व्हॉट्स ॲप/भ्रमण ध्वनी क्रमांक : 8976176276/ 8976176776

ईमेल आय डी : mumbai.addldit.inv7@incometax.gov.in

नियंत्रण कक्षाचा पत्ता : खोली क्रमांक. 316, तिसरा मजला, सिंधीया हाऊस , बलार्ड इस्टेट , मुंबई i-400001

लोकसभा निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष व्हाव्यात यासाठी नागरिकांनी अशी माहिती प्राप्तिकर विभागाला सादर करावी, अशी विनंती प्राप्तिकर विभागाने केली आहे.

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2015937) अभ्यागत कक्ष : 138
Read this releasein: English