माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्याचे कावी कलाकार सागर नाईक-मुळे यांचा 'मेरा पहला वोट देश के लिए' या मोहिमेत सहभाग
Posted On:
15 MAR 2024 4:45PM by PIB Mumbai
गोवा, 15 मार्च 2024
नवमतदारांना मतदानासाठी जागरूक करण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेल्या ‘मेरा पहला वोट देश के लिए’ या मोहिमेत गोव्यातील कावी कलाकार सागर नाईक-मुळे सहभागी झाले. या कलाकाराने देशभरातील नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यांसह कॅनव्हासवर नव मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करणारी कावी कलाकृती साकारली आहे. कावी कलेमध्ये गोव्याच्या जांभा दगडाच्या लाल मातीमध्ये आढळणाऱ्या चमकदार लाल रंगाचा वापर करून विविध माध्यमांद्वारे कुशलतेने विविध संकल्पना जिवंत केल्या जातात.
या कलाकृतीत वापरण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या या ज्यांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मासिक मन की बातमध्ये केला आहे त्या विविध व्यक्तिमत्त्वांच्या आहेत. मन की बातच्या 100 भागांच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी सागर नाईक मुळे यांना दिल्लीत आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमातच त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व निमंत्रितांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या, त्यापैकी बरेच जण पद्म पुरस्कार विजेते आहेत.या कावी कलाकाराने हा स्वाक्षऱ्या केलेला कॅनव्हास जतन केला होता आणि आगामी निवडणुकीत मतदान करून राष्ट्र उभारणीत सक्रिय भागीदार होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी त्याचा वापर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
कावी कलाकार सागर नाईक मुळे यांनी ही कलाकृती राष्ट्राला समर्पित केली आहे आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी राष्ट्राच्या मातीतून साकारलेली कलाकृती असे या कलाकृतीचे त्यांनी वर्णन केले आहे.
* * *
PIB Panaji | S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2015011)
Visitor Counter : 67