अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बनावट जीएसटी नोंदणी मिळवून सरकारी तिजोरीची 31.06 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीजीएसटी आणि सीई पालघर आयुक्तालयाकडून एकाला अटक

Posted On: 11 MAR 2024 5:40PM by PIB Mumbai

मुंबई, 11 मार्च 2024

 

बनावट जीएसटी नोंदणी मिळवून सरकारी तिजोरीची 31.06 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीजीएसटी आणि सीई पालघर आयुक्तालयाने एकाला अटक केली आहे.

13.39 कोटी रुपयांची बनावट  इनपुट टॅक्स क्रेडीट (आयटीसी) मंजूर  करण्याच्या उद्देशाने विविध मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीच्या आधारे बनावट जीएसटी नोंदणी करण्याच्या आणि प्राप्तकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवून देण्यासाठी 17.66 कोटी रुपयांच्या चुकीच्या आयटीसीचा लाभ घेणाऱ्या टोळीचा मुंबई क्षेत्राच्या पालघर आयुक्तालयाच्या तपास अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे.या टोळीचा मुख्य सूत्रधार मिश्रीलाल रामधर दुबे उर्फ अब्दुररहमान दुबे उर्फ अकील एच कासमनी याला गेल्या शुक्रवारी (8 मार्च 2024) अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासादरम्यान, मिश्रीलाल रामधर दुबे उर्फ अब्दुर रहमान दुबे उर्फ अकील एच कासम हा त्याच्या वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अंतर्गत विविध बनावट कंपन्या तयार करण्यात आणि बनावट पावत्या तयार करून तसेच भरणा  करून बनावट आयटीसी मंजूर करण्यासाठी तयार केलेल्या जीएसटीआयएनएसचा  वापर करण्यात  तसेच कमिशनच्या आधारावर अशा पावत्यांच्या  विविध प्राप्तकर्त्यांना बनावट आयटीसी मंजूर  करण्याच्या एकमेव हेतूने जीएसटीआर-1 परतावा भरण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे निदर्शनास आले. या उद्देशासाठी   मिश्रीलाल रामधर दुबे  एकूण 31 कंपन्या चालवत होता.

तपासादरम्यान गोळा केलेल्या प्रत्यक्ष  पुराव्यांच्या आधारे, मिश्रीलाल रामधर दुबे याला 8 मार्च 2024 रोजी सीजीएसटी  कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी  कायदा, 2017 च्या कलम 69 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2013479) Visitor Counter : 59


Read this release in: English