कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने विभागीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यासह दोन आरोपींना केली अटक, छापेही टाकले

Posted On: 07 MAR 2024 6:12PM by PIB Mumbai

मुंबई, 7 मार्च 2024

 

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने लाचखोरी प्रकरणात दोन आरोपींना अटक केली तसेच झडती घेतली. अटक केलेल्या आरोपींमध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील विभागीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याचा देखील  समावेश आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपीने अवाजवी रक्कम मागितल्याच्या तक्रारीवरून मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील विभागीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. 18.05.2023 ते 17.05.2025 या कालावधीत रेल्वेला वाहने उपलब्ध करून देण्यासाठी तक्रारदाराला महाव्यवस्थापक मार्फत कंत्राट मिळाले होते. या वाहनांपैकी एक वाहन भुसावळ येथील विभागीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यासाठी तैनात करण्यात आले होते. या वाहनाचे मासिक बिल पास करण्यासाठी प्राचार्य अवाजवी रकमेची  मागणी करत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. परंतु तक्रारदाराने ही मागणी अमान्य करत पैसे दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरोपींने लॉग बुकवर वेळेवर सही केली नाही.  25.02.2024 पासून सदर करार संपुष्टात आला होता परंतु तक्रारदाराचे 18.01.2024 ते 25.02.2024 या कालावधीचे बिल प्रलंबित राहीले होते, कारण, आरोपीने लॉग बुकवर स्वाक्षरी केली नव्हती. आणि लॉग बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी 5000 रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर आरोपींनी कथित अनुचित लाभाची रक्कम वाढवून 10,000 रुपये केली आणि शेवटी 9000 रुपयांवर तडजोड केली.

तक्रारदाराच्या तक्रारीवरून सीबीआयने सापळा रचला होता. सापळ्याच्या कारवाईदरम्यान, आरोपीने तक्रारदारास 9000 रुपये लाचेची रक्कम भुसावळ येथील विभागीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेत कार्यालय अधीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या त्याच्या कर्मचाऱ्याकडे सुपुर्द करण्याचे निर्देश दिले. या कार्यालय अधीक्षकाने ही  रक्कम स्विकारली आणि आरोपी प्राचार्याकडे सोपवली. त्यानंतर दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले आणि अटक करण्यात आली.

आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2012294) Visitor Counter : 39


Read this release in: English