ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
मानकीकरणाद्वारे तरुणांचे सक्षमीकरण: बीआयएस द्वारे स्टँडर्ड क्लबच्या मार्गदर्शकांसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
06 MAR 2024 8:27PM by PIB Mumbai
मुंबई, 6 मार्च 2024
गेल्या आठवड्यात (28 आणि 29 फेब्रुवारी 2024) रोजी मुंबईतील बीआयएस अर्थात भारतीय मानक ब्युरोच्या पश्चिम प्रादेशिक प्रयोगशाळेजवळ अंधेरी येथे बीआयएस मुंबई शाखा कार्यालय-I द्वारे महाराष्ट्रातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या स्टँडर्ड क्लब मार्गदर्शकांसाठी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बीआयएस मुंबई चा विशेषतः मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यातील मार्गदर्शकांकरिता हा सातवा उपक्रम आहे.
या कार्यक्रमात विविध शाळा/महाविद्यालयांमधील 25 मार्गदर्शकांचा सक्रिय सहभाग होता.

जी श्रेणीचे वैज्ञानिक आणि वरिष्ठ संचालक आणि प्रमुख, मुंबई शाखा कार्यालय-I चे वरिष्ठ संचालक आणि प्रमुख सतीश कुमार यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांमध्ये मानकीकरण आणि गुणवत्तेबाबत सजगता निर्माण करण्यासाठी बीआयएस च्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. तरुण पिढीमध्ये गुणवत्तेबद्दल जागरूकता निर्माण करणे, देशातील दर्जेदार परिसंस्थेच्या विकासास हातभार लावणे हा यामागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
डी श्रेणीचे शास्त्रज्ञ आणि बीआयएस मुंबईचे उपसंचालक पीयूष महादेवराव वासेकर यांनी मानकांच्या तपशीलवार अभ्यासात बीआयएसच्या उपक्रमांचा आढावा घेतला.

विशेषतः तरुणांमध्ये गुणवत्ता आणि मानकीकरणाची संस्कृती वाढवणे आणि गुणवत्ता-जागरूक राष्ट्र निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणे हे भारतीय मानक ब्युरोचे उद्दिष्ट आहे.
* * *
PIB Mumbai | S.Bedekar/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2012049)
Visitor Counter : 66