अणुऊर्जा विभाग
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अणु खनिज संचालनालय नागपूरद्वारे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, 200 हून अधिक विद्यार्थ्यांना 'विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' या विषयावर घेतला सहभाग
Posted On:
28 FEB 2024 8:17PM by PIB Mumbai
नागपूर, 28 फेब्रुवारी 2024
अणुऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या नागपूरच्या सिव्हिल लाइन्सस्थित असलेल्या अणु खनिज संचालनालय-एएमडीने आज राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहाने साजरा केला. या कार्यक्रमात संचालनालयाच्या उपक्रमांचे प्रदर्शन लावण्यात आले होते, विशेषत: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम, “विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान” ही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रारुपाद्वारे चित्रित करण्यात आली होती. संचालनालयाच्या कार्याची प्रचिती व्हावी याकरिता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूभौतिकी, क्ष-किरण फ्लूरोसेन्स आणि ड्रिलिंग तंत्रांचे प्रदर्शन करणारे स्टॉल्स याप्रसंगी उभारण्यात आले होते. विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे विज्ञान मॉडेल तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले गेले, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रवेशिका नंतर निवडल्या गेल्या आणि त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री पी.के. गुप्ता, प्रादेशिक संचालक, एएमडी, नागपूर, यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि विद्यार्थ्यांना अणुऊर्जेच्या क्षेत्रात अभ्यास आणि नवकल्पनांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी प्रदर्शनात दिलेल्या माहितीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे, मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक इंद्रदेव नारायण यांनी देशाचे भविष्य म्हणून मुलांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी प्रदर्शित केलेल्या प्रतिकृटीईबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रदर्शनादरम्यान, स्टॉलवरील वैज्ञानिक अधिकारी सुमारे 200 विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांच्या शंकांचे उत्तरे दिली, कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा समावेश होता आणि उपस्थितांसाठी अणु खनिजांच्या शोध आणि संशोधनाशी संबंधित चित्रपट दाखवण्यात आला.
श्री नारायण, श्री गुप्ता आणि श्री मिलिंद एम.एस. देशपांडे यांच्या हस्ते विज्ञान मॉडेल स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. उल्लेखनीय कामगिरींमध्ये सोमलवार हायस्कूलचे प्रथम पारितोषिक यथार्थ गोंडुले आणि हंसिका तेलरांधे, त्यानंतर केंद्रीय विद्यालय, वायुसेना नगर येथील पारस गणेश लोखंडे आणि सरस्वती विद्यालयातील गार्गी पराग कुकडे यांच्यासोबत मोहन राम मत्तापर्थी यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
बी. रघुवेंद्र यांनी आभार मानले. निश्मा ओझा यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
* * *
PIB Nagpur | S.Rai/SK/D.Wankhede/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2009912)
Visitor Counter : 63