रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे स्थानकांचा अभूतपूर्व कायापालट

Posted On: 28 FEB 2024 5:15PM by PIB Mumbai

मुंबई, 28 फेब्रुवारी 2024

 

भारतातील रेल्वे स्थानकांची स्थिती नजीकच्या काळात आमूलाग्र बदलणार आहेत. भारतीय रेल्वेची जी स्थानके कैक दशके त्याच स्थितीत आहेत आणि काही स्थानके तर अगदी शतकाहून अधिक काळ त्याच स्थितीत आहेत, ती सर्व स्थानके अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत आता कात टाकून अभूतपूर्व परिवर्तनासाठी सज्ज आहेत.  देशातील 1300 हून अधिक रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याच्या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेला 26 फेब्रुवारी 2024 रोजी आणखी चालना मिळाली जेव्हा पंतप्रधानांनी 553 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी केली . गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आलेल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे.

अमृत भारत स्थानक योजना लाखो प्रवाशांना प्रवासाचा सुखद अनुभव देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुरु असलेल्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक आहे.  या योजनेत सौंदर्यदृष्ट्या डिझाइन केलेला स्थानकाचा दर्शनी भाग, रीसरफेस केलेले रेल्वे फलाट, सुंदर लँडस्केपिंग, रूफ प्लाझा, कियॉस्क, उपहारगृह, मुलांसाठी खेळण्याची जागा यासारख्या आधुनिक प्रवासी सुविधा निर्माण करण्याची कल्पना आहे. प्रवाशांचा स्थानकात सहज प्रवेश सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांमध्ये रस्ते रुंदीकरण, अनावश्यक संरचना काढून टाकणे, योग्य आरेखन असलेली मार्गदर्शनपर चिन्ह फलक लावणे, समर्पित पादचारी मार्ग स्थापित करणे आणि पार्किंग सुविधा वाढवणे, तसेच सुधारित प्रकाश व्यवस्था करणे यांचा समावेश होतो.

अमृत भारत स्थानक योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पुनर्विकसित स्थानक  इमारतींचे डिझाईन स्थानिक संस्कृती, वारसा आणि वास्तुकला यांपासून प्रेरित असेल.  जसे की.  अहमदाबाद स्थानक मोढेरा येथील सूर्य मंदिरापासून प्रेरित असेल, तर द्वारका स्थानक द्वारकाधीश मंदिरापासून प्रेरित असेल. याशिवाय, गुरुग्राम स्टेशन माहिती  तंत्रज्ञान संकल्पनेवर आधारित असेल, तर ओडिशातील बालेश्वर स्थानक भगवान जगन्नाथ मंदिराच्या संकल्पनेवर आधारित असेल. तमिळनाडूतील कुंभकोणम स्थानकावर चोल वास्तुकलेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आढळून येईल.

पुनर्विकासाधीन असलेल्या स्थानकांपैकी, पुरी येथील स्थानक जगन्नाथ मंदिराच्या स्थापत्यकलेने प्रेरित आहेत, तर तामिळनाडूमधील मदुराई आणि रामेश्वरमची स्थानके अनुक्रमे मदुराई मीनाक्षी आणि रामनाथस्वामी मंदिरापासून प्रेरित आहेत.  कोटद्वारचे रेल्वे स्थानक थंड हवेच्या ठिकाणाच्या वास्तुकलेपासून प्रेरित आहे, तर उदयपूर स्थानकात उम्मेद भवन पॅलेसपासून प्रेरित घुमट बांधण्यात येत आहे. दिल्ली एनसीआर मधील फरिदाबाद, गाझियाबाद, सफदरजंग आणि बिजवासन यांसारखी स्थानके प्रयागराज, भुवनेश्वर, सिकंदराबाद आणि चेन्नई एग्मोर या स्थानकाप्रमाणेच आधुनिक दिसतील.  हैदराबादमधील हायटेक सिटी स्थानकाला आधुनिक डिझायनर रुप देण्यात आले आहे तर बेंगळुरूमधील - यशवंतपूर आणि बेंगळुरू कँट ही दोन स्थानकांचे विमानतळासारखे स्वरूप आहे. 

ज्यावेळी गांधीनगर हे स्थानक सर्व आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आधुनिकीकरण  झालेले,आणि पंचतारांकित हॉटेल असलेले पहिले रेल्वे स्थानक बनले, तेव्हापासूनच म्हणजे 2021सालापासूनच अमृत भारत स्थानक योजनेचा उगम झालेला दिसून येतो.    . नंतर त्याच वर्षी,पूर्वी हबीबगंज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी कमलापती रेल्वे स्थानकाने आधुनिक रूप धारण केले. 2022 मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला मंजुरी दिली, त्यात नवी दिल्ली रेल्वे स्थानक, अहमदाबाद रेल्वे स्थानक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ  म्हणून ओळखले जाणारे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांचा समावेश होता.

अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या स्थानकांपैकी सर्वाधिक 149 रेल्वे स्थानके उत्तर प्रदेशातील असून त्याखालोखाल  महाराष्ट्र 126, पश्चिम बंगाल 94, गुजरात 87, बिहार 86, राजस्थान 82 आणि मध्य प्रदेश 80 या स्थानकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील काही रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे.

स्थानकाचे नाव - नागपूर

सध्याची स्थिती:

ते कसे दिसेल:

स्थानकाचे नाव - सोलापूर

सध्याची स्थिती:

ते कसे दिसेल:

स्थानकाचे नाव - अजनी, नागपूर

सध्याची स्थिती:

ते कसे दिसेल:

महाराष्ट्रात अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत एकूण 126 स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. यात  अहमदनगर, अजनी (नागपूर), अकोला, आकुर्डी, अमळनेर, आमगाव, अमरावती, अंधेरी, औरंगाबाद, वांद्रे टर्मिनस, बारामती, बेलापूर, बोरिवली, भायखळा, चाळीसगाव, चांदा फोर्ट, चंद्रपूर, चर्नी रोड, छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस चिंचपोकळी, चिंचवड, दादर,दौंड, देहू रोड, देवलाली, धामणगाव, धरणगाव, धर्माबाद, धुळे, दिवा, दुधनी, गंगाखेर, गोधनी, गोंदिया, ग्रँट रोड, हडपसर, हातकणंगले, हजूर साहिब नांदेड, इगतपुरी, जालना, जेऊर, कल्याण जंक्शन, कांजूर मार्ग, कराड, किनवट, कोल्हापूर एससीएसएमटी, कोपरगाव, कुर्डूवाडी जंक्शन, कुर्ला जंक्शन, लासलगाव,लातूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणंद जंक्शन, लोणावळा, लोअर परळ, मालाड, मलकापूर, मनमाड जंक्शन, मनवाथ रोड, मरीन लाइन्स, माटुंगा, मीरज जंक्शन, मुदखेड जंक्शन, मुंबई सेंट्रल, मुंब्रा, मूर्तिजापूर जंक्शन, नागपूर जंक्शन, नांदुरा, नंदुरबार, नारखेर जंक्शन, नाशिक रोड, उस्मानाबाद, पाचोरा जंक्शन, पालघर, पंढरपूर, पुणेजं., शिर्डी, सांगली, सातारा, सेवाग्राम, शेगाव, शिवाजी नगर पुणे, सोलापूर या  महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.

भारताची जीवनरेखा (लाइफलाइन) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  भारतीय रेल्वे द्वारे दररोज 13,000 गाड्या चालवल्या जातात आणि देशभरातील 7,325 स्थानके याद्वारे जोडली जातात. अलिकडच्या वर्षांत रेल्वेने भांडवली खर्चात अभूतपूर्व वाढ केली आहे आणि 2024-25 या आर्थिक वर्षात भांडवली खर्चासाठी 2.52 लाख कोटी रुपये तरतूद केली आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/Shraddha/Sampada/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 2009829) Visitor Counter : 104


Read this release in: English