कृषी मंत्रालय
नागपूरच्या ,राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग व नियोजन ब्यूरो - एनबीएसएसएलयूपी तर्फे 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान "शाश्वत शेतीसाठी मृदा परिसंस्थेसाठी तांत्रिक सेवा योजना" या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
Posted On:
20 FEB 2024 8:25PM by PIB Mumbai
नागपूर, 20 फेब्रुवारी 2024
भारतात पाण्यासोबतच जमिनीची आणि विशेषतः मृदेची समस्या गंभीर असून मृदेच्या आरोग्य विषयी समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच भारतीय शेतीत विशेषतः विदर्भातील काळ्या मृदेचे महत्व आणि त्याचे सुयोग्य नियोजन व्हावे यासाठी,भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत नागपूरच्या अमरावती मार्गावर स्थित राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग व नियोजन ब्यूरो - एनबीएसएसएलयूपी तर्फे 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 "शाश्वत शेतीसाठी मृदा परिसंस्थेसाठी तांत्रिक सेवा योजना" या विषयावर 3 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे ,राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग व नियोजन ब्यूरो,अमरावती रोड,नागपूर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती एनबीएसएसएलयूपी नागपूरचे संचालक डॉ. एन.जी. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या सेमिनारचे मुख्य अतिथी एच.सी. गिरीश आयएफएस वॉटरशेड विकास विभाग ,कर्नाटक हे असून सेमीनारचे उद्घाटन सकाळी 9:30 वाजता होणार आहे .
मागील 30-40 वर्षापासून इंडियन सोसायटी ऑफ सॉईल सर्व्हे अँड लॅन्ड युझ प्लॅनिंग ब्यूरो सोबत एनबीएसएसएलयूपी मृदे संबंधी जनजागृती करत असून पुढील पिढीला उत्तम मृदा आणि लागवडी लायक जमीन उपलब्ध करून देणे यासाठी आग्रही असल्याचे डॉ . पाटील यांनी यावेळी सांगितले. देशात मृदेचे विविध प्रकार असून त्यांच्या पाणी धरून ठेवण्याची क्षमता वेगवेगळी आहे हेच लक्षात घेऊन ' डिजिटल सॉइल मॅपिंग तंत्रज्ञान ' विकसित झालेले असून देशाच्या मृदे संबंधी सर्व माहिती एका ठिकाणी मिळणे सोपे झाले आहे. जिल्हा आणि विभाग स्तरासोबतच गाव पातळीवर स्थानिक मृदा संबंधी सर्व माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी ब्यूरो प्रयत्नशील आहे. मागील 30 वर्षा पासूनची मृदेची माहिती आताच्या काळातील मृदेच्या मातीशी अद्यावत करण्याचे काम ब्यूरो करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या राष्ट्रीय सेमिनार मधे 200 पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार असून 17 विविध राज्यांतील संशोधक कृषी विद्यापीठ मधील शिक्षक, विद्यार्थी यांची उपस्थिती रहाणार आहे. देशापुढे शेतीतील वर्तमान काळातील आव्हाने कोणती असून नवीन तंत्रज्ञानाचा मृदा व्यवस्थापनात कसा उपयोग होईल यावर चर्चा होणार असून मृदा संबंधी विविध विषयांवर स्वतंत्र चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
SR/DW/DD/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2007526)
Visitor Counter : 133