संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय लष्कराकडून भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

Posted On: 14 FEB 2024 5:59PM by PIB Mumbai

 

भारतीय लष्कराने 13 फेब्रुवारी 24 ते 22 मार्च 24 या कालावधीत अग्निवीर आणि नियमित केडरच्या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील आणि दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in  या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. संकेतस्थळाच्या JCO/OR/Agniveer नावनोंदणी विभागात हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हिडिओसह पात्रता, नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे. अर्जदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वापरकर्ता अनुकूल चॅटबॉट देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेदरम्यान खेळाडू, एनसीसी प्रमाणपत्र धारक, आयटीआय आणि पदविका धारकांना अतिरिक्त गुण दिले जातील. ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेत ऑफिस असिस्टंट/एसकेटी श्रेणीसाठी प्रथमच टंकलेखन चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात दलाल आणि फसवणूक करणाऱ्यांना बळी न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही शंका आणि स्पष्टीकरणासाठी, अर्जदार जवळच्या सैन्य भरती कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

तरुणांसाठी राष्ट्रीय सुरक्षेसाठी योगदान देण्याची, मौल्यवान कौशल्ये विकसित करण्याची आणि शौर्य आणि अभिमानाचा वारसा असलेल्या प्रतिष्ठित संस्थेचा भाग होण्याची ही सुवर्णसंधी आहे.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2006105) Visitor Counter : 102


Read this release in: English