शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थेने (एनआयओएस) मार्च 2024 च्या एनआयओएस सार्वजनिक परीक्षेच्या माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर

प्रविष्टि तिथि: 12 FEB 2024 7:18PM by PIB Mumbai

पुणे , 12 फेब्रुवारी 2024

राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था  (एनआयओएस) मुख्यालयाद्वारे निश्चित केलेल्या तारखांना एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वर्षातून दोनदा सार्वजनिक परीक्षा आयोजित करते.

एनआयओएस सार्वजनिक परीक्षा मार्च 2024 च्या माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 11.03.2024 पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील निश्चित केलेल्या  परीक्षा केंद्रांवर होणार आहेत.

प्रात्यक्षिक परीक्षांसाठी परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट ) प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वी एनआयओएस संकेतस्थळ , https://sdmis.nios.ac.in वर उपलब्ध करून दिले जाईल. संबंधित विद्यार्थी/पालक/पालकांनी ताज्या माहितीसाठी  नियमितपणे एनआयओएस संकेतस्थळाला  भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2005387) आगंतुक पटल : 96
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English