रेल्वे मंत्रालय
लखनौ येथे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान 67 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या आयोजनासाठी रेल्वे सुरक्षा दल सज्ज
Posted On:
10 FEB 2024 12:00PM by PIB Mumbai
उत्तर प्रदेशात लखनौ येथे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या (एआयपीडीएम) आयोजनासाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) सज्ज झाले आहे. केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे 12 फेब्रुवारी रोजी उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे असतील. 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या समारोप समारंभाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी एआयपीडीएमच्या केंद्रीय समन्वय समितीने आरपीएफकडे सोपवली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश अंतर्गत सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने, गुन्ह्यांचा वैज्ञानिक पद्धतीने शोध आणि तपास करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांमध्ये उत्कृष्टता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे हा आहे.
67वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा हे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यावसायिकांना एकत्र येण्यासाठी, शिकण्यासाठी आणि त्यांच्या तपासातील उत्कृष्टतेचा सामूहिक प्रयत्न मजबूत करण्याचे आवाहन आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना एकमेकांच्या अनुभवातून फायदा होईल ज्यामुळे संपूर्ण दलाच्या व्यावसायिक कामगिरीचा दर्जा सुधारेल आणि कार्यक्षमता देखील वाढेल. या मेळाव्यात केंद्र आणि राज्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या 29 संस्थांचा सहभाग असेल आणि त्याद्वारे 1230 सदस्य विविध कार्यक्रमात सहभागी होतील.
विविध स्पर्धां , उदा. तपासासाठी वैज्ञानिक साधने , पोलिस फोटोग्राफी, संगणक जागरूकता, विशेष कॅनाइन युनिट स्पर्धा, तोडफोडीला प्रतिबंध आणि पोलिस व्हिडिओग्राफी,या मेळाव्यात आयोजित केल्या जातात आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमता सुधारण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी हे एक व्यासपीठ म्हणून काम करते.
या सर्व स्पर्धा लखनौ मधील जगजीवन राम आरपीएफ अकादमी येथे आयोजित केल्या जातील. जगजीवन राम आरपीएफ अकादमी, लखनौची स्थापना 1955 मध्ये रेल्वे मंत्रालयांतर्गत झाली. ती प्रोबेशनर्स, आयआरपीएफएस कॅडर अधिकारी आणि आरपीएफ उपनिरीक्षकांसाठी एक प्रमुख प्रशिक्षण संस्था म्हणून काम करते.
आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत, रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक मनोज यादव यांनी 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी आरपीएफच्या टेक ग्रुपने तयार केलेले समर्पित मोबाइल ॲप्लिकेशन आणि संकेतस्थळाचा शुभारंभ केला.
इन-हाउस विकसित केलेले, हे डिजिटल प्लॅटफॉर्म संवाद सुलभ करण्यासाठी, रिअल टाइम माहिती पुरवण्यासाठी आणि ऑटोबॉट-आधारित बहु-भाषिक चॅट सपोर्ट सारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी विनाखंड सहभाग सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. ॲप आणि वेबसाइट महत्वपूर्ण साधने म्हणून काम करतील, सहभागींचा एकूण अनुभव समृद्ध करतील आणि सध्याच्या डिजिटल युगातील कॅडेट्समधील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तपास कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या वचनबद्धतेला बळ देतील. इथे सायबर गुन्हे आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या नवीन उदयोन्मुख क्षेत्रातील अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहे.
रेल्वे सुरक्षा दल 2004 पासून रेल्वे मालमत्तेचे रक्षण आणि प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हउल्लेखनीय बाब म्हणजे आरपीएफमध्ये महिलांचे 9% प्रतिनिधित्व आहे जी भारतातील सर्व सशस्त्र दलांमधील सर्वाधिक टक्केवारी आहे.
***
H.Akude/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004773)
Visitor Counter : 130