गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
2023 वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे वित्तीय निकाल
हुडकोने निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 33.33% वाढ नोंदवली, महसुलात 10.04% वाढ
प्रविष्टि तिथि:
09 FEB 2024 8:35PM by PIB Mumbai
मुंबई, 9 फेब्रुवारी 2024
गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ लिमिटेड (हुडको ) च्या संचालक मंडळाने आज मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत डिसेंबर 2023 (आर्थिक वर्ष 2023-24) मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी मर्यादित आढावा घेतलेल्या वित्तीय निकालांना मंजुरी दिली.
कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत करपश्चात नफ्यात 33.33% इतकी उल्लेखनीय वाढ नोंदवली आणि तिमाहीच्या तुलनेत (QoQ) 14.94% वाढ नोंदवली.
महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.04% वाढ तर तिमाहीच्या तुलनेत 7.93% वाढ नोंदवली . या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय ऋण पुस्तिकेमध्ये झालेली 79,290 कोटी वरून .84,424 कोटी रुपये वार्षिक वाढ आणि अनुत्पादक मालमत्तेत 0.96% वरून 0.44% पर्यंत झालेली लक्षणीय घट याला आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीच्या तुलनेत 2023-24 च्या डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीतील प्रमुख आर्थिक ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
- उत्पादनातून मिळालेला महसूल: 9 महिन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.04% वाढ , महसूल 5,,197.08 कोटी वरून 5,719.07 कोटी रुपयांवर
- करपश्चात नफा : 9 महिन्यांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत 33.33% वाढ , 1,062.43 कोटी वरून वाढून 1,416.58 कोटी रुपयांवर
- ऋण पुस्तिका: गेल्या वर्षीच्या 79,290 कोटी रुपयांच्या तुलनेत 84,424 कोटी रुपये
- एकूण अनुत्पादक मालमत्ता : गेल्या वर्षीच्या 4.27% तुलनेत 3.14% पर्यंत लक्षणीय घट
- निव्वळ अनुत्पादक मालमत्ता : 0.96% वरून 0.44% पर्यंत लक्षणीय घट
- प्रति समभाग कमाई: वार्षिक वाढ 5.31 रुपये वरून 7.08 रुपये
हुडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कुलश्रेष्ठ यांनी या आर्थिक निकालांबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “हुडको ही गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत सर्वात कमी अनुत्पादक मालमत्ता आणि डेट -इक्विटी आणि पुरेसे भांडवल गुणोत्तर असलेली सरकारी कंपनी असून पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी पुरवठा करून राष्ट्रासाठी मालमत्ता निर्माण करण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. हुडकोवर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले . मार्च 2023 मधील बाजार भांडवल 10,000 कोटींवरून 9 महिन्यांच्या अल्प कालावधीत डिसेंबर 2023 मध्ये 40,000 कोटींपर्यंत वाढविण्यात मदत .झाली. कर्जाचा खर्च कमी करण्यासाठी, बाह्य व्यावसायिक कर्ज मार्गाने निधी जमवला जात आहे. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे आणि या संधींचा लाभ घेण्यासाठी हुडको सज्ज आहे.
हुडकोच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी कंपनीच्या वाढीचे श्रेय हितधारकांचा विश्वास आणि पाठिंबा यांना दिले. त्यांनी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी , गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर; गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार सचिव मनोज जोशी आणि संचालक मंडळाचे निरंतर पाठिंबा आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
* * *
PIB Mumbai | S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2004706)
आगंतुक पटल : 70
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English