अणुऊर्जा विभाग
रोसॅटॉमच्या महासंचालकांनी कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पांना भेट देऊन घेतला आढावा
अणुऊर्जा विभाग सचिव आणि रोसॅटॉमच्या महासंचालकांनी यांनी 2008 मध्ये आंतर-सरकार झालेल्या करारामधील दुरुस्तीवर केली स्वाक्षरी
Posted On:
09 FEB 2024 6:15PM by PIB Mumbai
मुंबई, 9 फेब्रुवारी 2024
अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ.ए.के. मोहंती आणि रोसॅटॉमचे महासंचालक डॉ. ए.ई.लिखाचेव यांनी 7 आणि 8 फेब्रुवारी 2024 रोजी कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पांना (KKNPP) भेट दिली. KKNPP युनिट 3 आणि 4 च्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ही द्विपक्षीय बैठक झाली. त्यांनी KKNPP च्या युनिट 1 आणि 2 च्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आणि KKNPP च्या युनिट 3 ते युनिट 6 च्या चालू बांधकामाला गती देण्यासाठी मार्ग आणि प्रगतीवर चर्चा केली.
नागरी आण्विक सहकार्याच्या इतर क्षेत्रांतील संबंध अधिक दृढ करण्यावरही शिष्टमंडळांनी चर्चा केली. 8 फेब्रुवारी 2024 रोजी, डॉ. मोहंती आणि डॉ. लिखाचेव्ह यांनी 2008 च्या आंतर-सरकारी कराराच्या दुरुस्तीवर स्वाक्षरी केली.
* * *
PIB Mumbai | S.Bedekar/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004605)
Visitor Counter : 109