संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पेंटॅगॉन प्रेस आणि लष्कराच्या  दक्षिण कमांडच्या वतीने  आयोजित  “कलम आणि कवच संरक्षण साहित्य महोत्सव यशस्वीरित्या संपन्न

Posted On: 03 FEB 2024 12:37PM by PIB Mumbai

 

पेंटॅगॉन प्रेस आणि लष्कराच्या  दक्षिण कमांडच्या सहकार्याने पुण्यातील राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड  इन्स्टिटयूट येथे कलम आणि कवचया संरक्षणविषयक  साहित्य महोत्सवाचे दि. 3 फेब्रुवारी 24 रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीबीएस) जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.

भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या विकसित होत असलेल्या परिदृश्यावर काम करण्यासाठी आपले प्राचीन ग्रंथ ‘’महाभारत आणि  भगवद गीता’’ यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे.  जनरल अनिल चौहान यांनी आपल्या भाषणात धर्माच्या शाश्वत प्रासंगिकतेला प्रोत्साहन देत कर्तव्य, धर्म आणि नैतिक संतुलन साधण्याच्या सिद्धांतावर भर दिला. या प्राचीन रणनीतींना आधुनिक काळातील धोके आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी अनुकूल बनवण्याच्या गरजेवर दक्षिण कमांडचे प्रमुख  लेफ्टनंट  जनरल ए  के सिंह यांनी भर दिला.

या महोत्सवात चार महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. यामध्ये जागतिक भू-राजनीती पासून राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्त्वपूर्ण भूमिका यावर आधारित पुस्तकांचा समावेश आहे. या चार पुस्तकांमध्ये अजय सिंह लिखित "रूस, गाजा, ताइवान... ए वर्ल्ड एट वॉर" तसंच कर्नल अमित सिन्हा आणि विजय खरे लिखित "ए आय एंड नेशनल सिक्योरिटी" या पुस्तकांचाही समावेश आहे.

कारगिल युद्धाला पंचवीस वर्षे पूर्ण होत असताना पेंटागॉन प्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन आर्य यांनी राष्ट्रीय सुरक्षेतील जागरूकता वाढवण्यासाठी कंपनीच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात आयोजित आत्मनिर्भर भारत - भारतीय संरक्षण क्षेत्राला सशक्त बनवणेया विशेष सत्रात श्री बाबा कल्याणी यांच्यासारखे प्रमुख उद्योग नेते सहभागी झाले होते.

पुण्यात आयोजित हा महत्त्वपूर्ण महोत्सव, या विषयातील सर्व तज्ञांना एका व्यासपीठावर आणण्यात सफल ठरला. या महोत्सवात तज्ञांनी जगभरात घडत असलेल्या संघर्षाबाबत तसेच देशाच्या  संरक्षण lविषयक   भूमिकेपर्यंतच्या विविध मुद्द्यावर  चर्चा केली. हा महोत्सव भविष्यातील आयोजनासाठी एक विषय सूची ठरू शकतो. इतिहास, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा या मुद्द्यांना एका सामंजस्यपूर्ण कथेमध्ये सामील करणे हा या उत्सवाचा महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.

***

M.Iyengar/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2002204) Visitor Counter : 118


Read this release in: English