आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
एम्स नागपूर येथे अत्याधुनिक स्किल लॅब तसच सेंट्रल स्टेराइल सर्व्हिसेस डिपार्टमेंट या सुविधेचे केंद्रीय आरोग्य आणिकुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते 3 फेब्रुवारीला होणार उद्घाटन
Posted On:
02 FEB 2024 7:22PM by PIB Mumbai
नागपूर 2 फेब्रुवारी2024
नागपूरच्या मिहान स्थित केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गतअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स नागपूर येथे अत्याधुनिक स्किल लॅब तसेच सेंट्रल स्टराइल सर्व्हिसेस डिपार्टमेंट - सीएसएसडी या सुविधेचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, एस. पी. सिंग बघेल आणि एम्स नागपूरचेकार्यकारी संचालक डॉ. हनुमंथा राव, यांच्या उपस्थितीमध्ये उद्या 3 फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी 10 वाजता दुरुस्थ पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य समारंभराजस्थानच्या एम्स जोधपुर येथे होणार आहे.
एम्स नागपूर येथीलकौशल्य प्रयोगशाळा ही अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे ह्युमन पेशंट सिमुलेटर आणि वर्चुअलटास्क ट्रेनर्स या प्रमुख सुविधांनी सुसज्ज अशा या प्रयोगशाळा राहतील. या प्रयोगशाळामुळेकौशल्य प्रशिक्षण आपत्कालीन परिस्थिती, अनस्थेशिया सिमुलेशनआणि परिस्थिती आधारित शिक्षण या उपक्रमांना चालला मिळणार आहे. या सुविधेमुळे वास्तविकरुग्णांना धोका न देता शिकण्यासाठी एका सुरक्षित वातावरणाची निर्मिती होणार असून अत्याधुनिकवर्चुअल टास्क ट्रेनर सुविधांमध्ये पेशंट केअरसिमुलेटर, इंजेक्शन आणि प्रक्रिया सिमुलेटर यासारख्या विविध कौशल्य सिमुलेटरचा समावेश आहे. या स्किललॅबचा वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदाहोईल . वैद्यकीय विद्यार्थी ,रहिवासी डॉक्टर, परिचारिका, प्राध्यापक आणि इतर आरोग्य सेवा कर्मचा-यांना त्यांचे कौशल्यआणि ज्ञान या प्रयोगशाळेच्या माध्यमातून वाढवता येणार आहे .
यासोबतच सेंट्रल स्टेराइलसर्व्हिसेस डिपार्टमेंट - सीएसएसडी ही एक प्रशस्तअशी सुविधा 5 हजार चौरस फूट परिसरात मेडिकलस्र्टलायझेशन तंत्रज्ञानामध्ये रुग्णांची काळजी आणि सुरक्षिततेची सर्वोच्च मानके सुनिश्चितकरेल. या सुविधेमध्ये अत्याधुनिक प्रगत उपकरणे,तंत्रज्ञान, कार्यक्षम प्रणाली , 24 तास अखंड सेवा यांचा समावेश आहे.
***
AIIMS PRO/SR/DW/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2002031)
अभ्यागत कक्ष : 95