सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुमारे 25 वर्षांच्या रंगमंचीय उत्कृष्टतेचा आविष्कार घडवत, भारत रंग महोत्सव 2024 चे उद्घाटन


भारत रंग महोत्सव हा सांस्कृतिक देवाणघेवाणीचे सामर्थ्य आणि कलेच्या सादरीकरणातील परिवर्तनात्मक प्रभावाची साक्ष देणारा : राज्यपाल

Posted On: 01 FEB 2024 10:33PM by PIB Mumbai

मुंबई, 1 फेब्रुवारी 2024

 

मुंबईत एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे आज जगातील सर्वात भव्य रंगमंचीय महोत्सव म्हणून मान्यता मिळालेल्या भारत रंग महोत्सवाचे (बीआरएम 2024) उद्घाटन झाले.या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस यांच्यासह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेचे अध्यक्ष, अभिनेता परेश रावल तसेच ज्येष्ठ अभिनेता रघुवीर यादव या मान्यवरांच्या उपस्थितीत या महत्त्वाच्या सांस्कृतिक सोहोळ्याची सुरुवात झाली.

देशभरातील 15 शहरांमध्ये आजपासून 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालणाऱ्या या बीआरएम 2024 महोत्सवात दीडशेहून अधिक वैविध्यपूर्ण सादरीकरणे होणार आहेत. रंगमंचावरील गुंगवून टाकणाऱ्या सादरीकरणांबरोबरच, या महोत्सवामध्ये भारतीय तसेच जागतिक अशा दोन्हीकडील रंगमंच विषयक परंपरांच्या उत्साहाने सळसळत्या सोहोळ्याची जोपासना  करणाऱ्या कार्यशाळा, चर्चासत्रे आणि अभ्यास वर्गांचा समावेश असलेल्या व्यापक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यावर्षीच्या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे कारण हे वर्ष भारत रंग महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून सांस्कृतिक समृद्धता आणि कलात्मक देवाणघेवाणीचा पुरावा म्हणून रंगमंच कलेचे रसिक, कलाकार आणि प्रतिभावंत यांना एकत्र आणले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्, वंदे भारतम्’ ही या महोत्सवाची व्यापक संकल्पना आहे.

या प्रसंगी, उपस्थितांशी संवाद साधताना राज्यपाल रमेश बैस यांनी सादरीकरण कलेच्या वैश्विक भाषेच्या माध्यमातून मने एकत्र आणण्याच्या, मतभेदांना सांधण्याच्यातसेच सामायिक समज जोपासण्याच्या या महोत्सवामध्ये असलेल्या सामर्थ्याचा उल्लेख केला.
एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी यांनी या महोत्सवाबाबत मोठ्या उत्सुकता व्यक्त करत कलात्मक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक विविधता यांच्याप्रती संस्थेच्या कटिबद्धतेवर अधिक भर दिला.

एक नवोन्मेषी उपक्रम हाती घेत, यावर्षी, एनएसडीतर्फे ‘रंग हाट’  हा वार्षिक उपक्रम देखील सुरु करण्यात येणार आहे. आशियात उद्घाटनपर जागतिक रंगमंच बाजार स्थापन करण्याच्या तसेच रंगमंच क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोगाचे संगोपन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला आहे.

महोत्सवाच्या या रौप्यमहोत्सवी वर्षात रंगमंच कलेच्या परिवर्तनशील सामर्थ्याचा देशव्यापी उत्सव साजरा केला जाणार असून मुंबई, पुणे, भूज, विजयवाडा, जोधपूर, दिब्रुगड, भुवनेश्वर, पाटणा, रामनगर तसेच श्रीनगर या शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बीआरएम 2024 मध्ये ‘रंग हाट’  उपक्रम देखील सुरु करण्यात येणार असून आशियामध्‍ये  उद्घाटनपर जागतिक रंगमंच बाजार स्थापन करणे तसेच रंगमंच क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोगाचे संगोपन करणे आणि कलाकार, आयोजक, रसिक आणि समर्थक यांच्यासाठी मंच उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

अधिक माहितीसाठी कृपया एनएसडी/बीआरएम च्या पुढील अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या:  https://nsd.gov.in/, www.brm.nsd.gov.in

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 2001696) Visitor Counter : 82


Read this release in: English