मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

पशुसंवर्धन क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासनिधीला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 01 FEB 2024 1:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 1 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने येत्या  तीन वर्षांसाठी म्हणजे  2025-26 पर्यंत  29,610.25 कोटी रुपयांचा विकास निधी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा निधी (AHIDF), या अंतर्गत येणाऱ्या,(IDF) पायाभूत सुविधांसाठी सुरू ठेवण्यास,मंजुरी दिली आहे. ही योजना दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया आणि उत्पादनांतील  वैविध्य , मांस प्रक्रिया आणि उत्पादनाचे वैविध्य, पशुखाद्य वनस्पती, उच्च जातीच्या पशुंची पैदास, पशु कचरा त्यातून उत्पनांचे स्रोत तयार करणे(कृषी-कचरा व्यवस्थापन) तसेच पशुवैद्यकीय लस आणि औषध उत्पादन यासारख्या सुविधांमधील  गुंतवणूकीला प्रोत्साहन देईल.

यासाठी भारत सरकारच्या शेड्युल्ड बँका, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NCDC), नाबार्ड  आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ(NDDB) या वित्तसंस्था 90% कर्जासाठी दोन वर्षांच्या स्थगितीसह 8 वर्षांसाठी 3% व्याज इतकी सवलत देतील. यासाठी व्यक्ती, खाजगी कंपन्या, कृषी उत्पन्न संस्था(FPO), मध्यम,लघुआणि सूक्ष्म उद्योग विभाग (MSME), अशा  8 संस्था पात्र आहेत. आता त्यासोबतच सहकारी दुग्ध संस्थांनाही दुग्ध प्रकल्पांचे  आधुनिकीकरण, बळकटीकरण यासाठी हे लाभ मिळणार आहेत.

मध्यम,लघुआणि सूक्ष्म उद्योग विभाग आणि दुग्ध सहकारी संस्थांना भारत सरकार 750 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज हमी  निधीतून, घेतलेल्या  कर्जाच्या  25% पर्यंत कर्जाची हमी देखील देईल.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा निधीतून (AHIDF) आतापर्यंत  प्रतिदिन 141.04 लाख लीटर दूध उत्पादन (LLPD Lakh Ltr. )79.24 लाख मेट्रिक टन पशुखाद्य प्रक्रिया क्षमता आणि 9.06 लाख मेट्रिक टन मांस प्रक्रिया क्षमता प्रभावीपणे निर्माण केली असून या योजनेच्या प्रारंभापासून पुरवठा साखळीत दूध प्रक्रिया क्षमता, जोडून दाखवली आहे. या योजनेमुळे दुग्ध, मांस आणि पशुखाद्य क्षेत्रात प्रक्रिया क्षमता 2-4% वाढविण्यात यश आले आहे.

पशुसंवर्धन क्षेत्र गुंतवणुकदारांना पशुधन क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी देते ज्यामुळे, शीत साखळी आणि दूध उत्पादन, मांस, पशुखाद्य युनिट्सच्या एकात्मिक युनिट्सपासून ते तांत्रिकदृष्ट्या सहाय्यित पशुधन आणि कुक्कुटपालन, पशु कचरा संपत्ती व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय औषधे/लस युनिट्सची स्थापना या हे क्षेत्रांचे मूल्यवर्धन झाले आहे.

तांत्रिकदृष्ट्या सहाय्यभूत पशूंची उत्तम पैदास, पशुवैद्यकीय औषधे आणि लसनिर्मिती  युनिटचे बळकटीकरण, पशु कचरा ते संपत्ती व्यवस्थापन यासारख्या नवीन उपक्रमांचा समावेश केल्यानंतर, ही योजना पशुधन क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या सुधारणांमधे मोठी वाढ दर्शवेल.

N.Meshram/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2001211) Visitor Counter : 88