दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

37 वी अखिल भारतीय पोस्टल वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक स्पर्धा

Posted On: 27 JAN 2024 2:31PM by PIB Mumbai

 

पुणे, दि.27 जानेवारी 24

भारतीय टपाल खात्याच्या वतीने 37 व्या अखिल भारतीय पोस्टल वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक स्पर्धेचे आयोजन पुणे येथे 30 जानेवारी 2024 ते 02 फेब्रुवारी 2024 या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, पुणे 411045 येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे संपन्न होणार असून पीसीएमसी आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. श्री. किरण भगत, महाराष्ट्र केसरी, उपविजेते हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री किशन कुमार शर्मा, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, श्री रामचंद्र जायभाये, पोस्टमास्टर जनरल पुणे रीजन आणि श्रीमती सिमरन कौर, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस, पुणे रीजन  उपस्थित राहणार आहेत.

या आधीची 36 वी अखिल भारतीय पोस्टल वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक स्पर्धा ही राजस्थान मधील जयपूर, राजस्थान येथे संपन्न झाली.

पुण्यामध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशभरातील जवळपास 150 स्पर्धक सहभागी होणार आहेत. दिवसनिहाय कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत:

  1. 30/01/2024:

वजनाच्या 10 प्रकारांमध्ये वेट लिफ्टिंग स्पर्धा

  1. 31/01/2024 आणि 01/02/2024:

वजनाच्या 08 प्रकारांमध्ये पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आणि दिनांक 01/02/2024 रोजी सांस्कृतिक संध्या

  1. 02/02/2024:

वजनाच्या 10 प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट शारीरिक स्पर्धा, त्यानंतर आर्म रेसलिंग डेमो आणि समारोप समारंभ

या स्पर्धेतील विजेते केंद्र सरकारच्या आंतर-विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी होतील. तसेच बक्षीस वितरणादरम्यान सर्वोत्कृष्ट शारीरिक स्पर्धकास "डाक श्री" प्रदान केले जाईल.

भारतीय डाक विभाग सर्व जनतेला, ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि खेळाडू व संघांना प्रोत्साहित करण्यासाठी हार्दिक निमंत्रित करत आहे.

***

M.Iyengar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000011) अभ्यागत कक्ष : 133
Read this releasein: English