संरक्षण मंत्रालय
दक्षिण कमांडने साजरा केला 75 वा प्रजासत्ताक दिन
Posted On:
26 JAN 2024 7:55PM by PIB Mumbai
पुणे, 26 जानेवारी 2024
भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 रोजी दक्षिण कमांडच्या पुणे येथील मुख्यालयात पारंपारिक पद्धतीने आणि आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला. स्टेशन कमांडर पुणे चे एसएम ब्रिगेडियर संदीप वासुदेव यांनी पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, आर्मी कमांडर, सदर्न कमांड, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. या कार्यक्रमाला अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, इतर पदाधिकारी, माजी सैनिक आणि स्थानिक लोक उपस्थित होते. स्टेशन कमांडर यांनी याप्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांना देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्यास आणि राष्ट्र उभारणीत पूर्ण कार्यक्षमतेने योगदान देण्यास प्रोत्साहित केले.
JHJA.jpg)
62 वर्षीय कुमार अजवानी यांनी आपल्या संरक्षण दलांना सलाम करण्यासाठी आयोजित केलेल्या 3000 किलोमीटरच्या 'नमन आणि सन्मान रन' या अभिवादन दौडचे स्वागत करण्यात आले. अजवानी यांनी ही दौड 27 नोव्हेंबर 2023 रोजी अमृतसर येथून सुरू केली होती, जालंधर, कर्नाल, नवी दिल्ली, जयपूर, इंदूर अशा सर्व ठिकाणी प्रवास करून शेवटी 26 जानेवारी 2023 (दिवस 60) रोजी पुणे येथे ही दौड संपली. आपली राष्ट्रीय एकतेविषयी निष्ठा व्यक्त करण्यासाठी आणि सर्व शहीद शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी त्यांनी ही दौड आयोजित केली होती.
75R0.jpg)
ब्रिगेडियर संदीप वासुदेव यांनी या दौडचे स्वागत केले आणि कुमार अजवानी यांनी हा अविश्वसनीय प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल,तसेच युद्धातील वीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी हाती घेतलेल्या उदात्त उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
* * *
PIB Pune | S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999936)
Visitor Counter : 69