आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्याच्या राष्ट्रीय नेचरोपॅथी संस्थेतर्फे यंदाचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Posted On: 26 JAN 2024 4:21PM by PIB Mumbai

पुणे, 26 जानेवारी 2024 

 

पुण्याच्या राष्ट्रीय नेचरोपॅथी संस्थेतर्फे (एनआयएन) ने आपल्या महान राष्ट्राची एकता आणि विविधतेची भावना प्रदर्शित करणारा 75 वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला. 

एनआयएनच्या संचालक प्रा.डॉ. के. सत्यलक्ष्मी यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावून सोहोळ्याचा प्रारंभ झाला. त्यांनी नंतर उपस्थितांसमोर प्रेरणादायी भाषण केले. संचालकांनी त्यांच्या भाषणात, सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांगीण आणि नैसर्गिक जीवनशैली स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

   

प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात संचालक सत्यलक्ष्मी यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या महान नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख केला.

या सोहोळ्यात आपल्या राष्ट्रातील समृद्ध विविधता दर्शविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. डॉक्टर, विद्यार्थी आणि एनआयएन च्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेली राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करणारी पारंपारिक नृत्य, देशभक्तीपर गाणी आणि प्रेरणादायी नाट्यछटा पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी नैसर्गिक आणि सर्वांगीण आरोग्य सेवा प्रगत करण्याची बांधिलकी राष्ट्रीय नेचरोपॅथी संस्था जोपासत आहे.

 

* * *

PIB Pune | M.Iyengar/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1999887) Visitor Counter : 66


Read this release in: English