वस्त्रोद्योग मंत्रालय
एनआयएफटी, खारघर येथे एनआयएफटीचा 39 वा स्थापना दिन साजरा
Posted On:
23 JAN 2024 8:50PM by PIB Mumbai
मुंबई, 23 जानेवारी 2024
नवी मुंबईतील खारघर येथील राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयएफटी)परिसरामध्ये एनआयएफटीचा 39 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, प्रतिबिंब, संस्कृती आणि उद्योगाचा संयोग यात पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि उत्साहाचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून गेला.
उत्साही फ्लॅश मॉब आणि आकर्षक हुक-स्टेप नृत्यासह एनआयएफटी बोधचिन्हाची करण्यात आलेली अनोखी रचना हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.या कार्यक्रमात स्टुडंट्स डेव्हलपमेंट अॅक्टिव्हिटी क्लबने आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमांचा समावेश होता, हॉर्नबिल्स आणि कौटुंबिक मूल्यांवर आधारित नृत्य नाटिका , डेसिबल्सद्वारे डायनॅमिक कॉलेज बँड सादरीकरण आणि एकल आणि युगल नृत्य सादरीकरण यांचा समावेश होता. लिटररी क्लबच्या ड्रामा सोसायटी 'आगाह 'ने जनजागृतीपर विचारप्रवर्तक पथनाट्य सादर केले, त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
एथिक्स अँड सोशल सर्व्हिसेस क्लबने 'एनआयएफटी डायरीज' या संकल्पनेवर आधारित केशरचना आणि रंगभूषा आणि चेहरा रंगवण्याच्या उपक्रमासह या कार्यक्रमाला सर्जनशीलतेचा स्पर्श दिला. स्टुडंट्स डेव्हलपमेंट अॅक्टिव्हिटी क्लबने एनआयएफटी मुंबई येथे विद्यार्थ्यांच्या आठवणींचे चित्ररूप दर्शवणारी 'एनआयएफटी इज यु ' नावाची एक सचेत भित्तिचित्रे देखील प्रदर्शित केली.अॅडव्हेंचर अँड फोटोग्राफी क्लबने आयोजित केलेल्या प्रदर्शनात महामारीनानंतर विद्यार्थ्यांच्या यशाची झलक दाखवण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली, त्यानंतर एनआयएफटी मुंबईचे संचालक प्रा.डॉ.पवन गोदियावाला यांनी स्वागत केले.देशाच्या जीडीपी मध्ये फॅशन आणि जीवनशैली उद्योगाच्या महत्त्वपूर्ण योगदान प्रतिबिंबित करून, त्यांनी या यशाचे श्रेय समर्पित प्राध्यापक, अधिकारी आणि 10,000 पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांना दिले.प्रा डॉ पवन गोदियावाला यांनी 1995 मध्ये एनआयएफटी मुंबई परिसराच्या स्थापनेमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल संस्थापक सदस्य, प्रा डॉ शर्मिला दुआ यांचे आभार मानले. नवीन उंची गाठण्यासाठी विद्यार्थी उद्योगाचे भविष्य आहेत असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
या कार्यक्रमासाठी एनआयएफटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते, या माजी विद्यार्थ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.माजी विद्यार्थ्यांच्या एका संवाद सत्रात या उद्योग व्यावसायिकांचे अनुभव आणि प्रवास मांडण्यात आला. ज्याने एनआयएफटी मुंबई येथे शिकत असतानाच्या त्यांच्या यशाच्या मुळांबद्दल सूक्ष्म दृष्टिकोन मांडला. परस्परसंवादी सत्रात या माजी विद्यार्थ्यांना एनआयएफटीमधील दिवसांत मिळवलेली प्रमुख कौशल्ये, त्यांनी तोंड दिलेली आव्हाने, सर्जनशील प्रक्रिया, शाश्वत पद्धती आणि फॅशन प्रेमींच्या पुढच्या पिढीसाठी सल्ला यावर चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम उत्साही एनआयएफटी समुदायाची लवचिकता, सर्जनशीलता आणि फॅशन उद्योगाच्या भविष्याला आकार देण्याच्या वचनबद्धतेची साक्ष ठरला.
* * *
PIB Mumbai | R.Aghor/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1998960)
Visitor Counter : 66